Vardha Heavy Rainfall
Vardha Heavy RainfallTeam Lokshahi

वर्ध्यात पावसाचं थैमान; विज पडून दोघांचा मृत्यू, दोघे पुरात गेले वाहून, 10 जण अडकले

Vardha News : घरात दोन ते चारफुट पाणी साचल्याने अनेक कुटुंब उघड्यावर आले. जिल्ह्यातील अनेक रस्त्यावरील पुलावरून पूर वाहत असल्याने अनेक गावाचा संपर्क तुटला. वर्धा, देवळी,पुलगाव, अल्लीपुर, हिंगणघाट या परिसरात पावसामुळे चांगलाच फटका बसला.
Published by :
Sudhir Kakde
Published on

भूपेश बारंगे | वर्धा : वर्ध्यातील दोन दिवसांपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू केली आहे. काही भागात आज दुपारपासून मुसळधार पाऊस पडला. जिल्ह्यात काही भागात ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने अनेक नदी नाल्याना पूर आला. यामुळे अनेक गावाचा संपर्क तुटला, तर धोत्रा शिवारात 10 मजूर पुरात अडकले आणि वेगवेगळ्या ठिकाणी दोघे जण पुरात वाहून गेले. तर दोघांचा वीज पडून मृत्यू झाला. पावसाच्या थैमानाने अनेक भागात पाणी साचलं असून अनेक नदी नाले तुडुंब भरून वाहू लागल्याने शेकडो शेतात पाणी शिरले. शेतातून पाणी गेल्याने शेतकऱ्यांचा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. काही गावातील घरात पाणी शिरल्याने अनेक कुटुंबाचे जीवनावश्यक वस्तू भिजल्या गेले. घरात दोन ते चारफुट पाणी साचल्याने अनेक कुटुंब उघड्यावर आले. जिल्ह्यातील अनेक रस्त्यावरील पुलावरून पूर वाहत असल्याने अनेक गावाचा संपर्क तुटला. वर्धा, देवळी,पुलगाव, अल्लीपुर, हिंगणघाट या परिसरात पावसामुळे चांगलाच फटका बसला. (Heavy Rainfall in Vardha)

वीज पडून दोघांचा मृत्यू

वर्धा तालुक्यातील कुरझडी व नांदगाव शिवारात वीज पडून शेतकरी महिला व पुरुषाचा मृत्यू झाला. नांदगाव येथील शेतकरी महिला गीता गजानन मेश्राम (वय 36 वर्ष) ही पाऊस सुरू झाल्याने झाडाखाली बसली असता आकाशात विजेचा कडकडाट होताच गीता हिच्या अंगावर वीज पडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला तर कुरझडी येथील शेतकरी श्रीराम कृष्णाजी शेंडे (वय 65वर्ष)यांच्या अंगावर वीज पडल्याने मृत्यू झाला. दोघांचा वेगवेगळ्या ठिकाणी मृत्यू झाला आहे.दोघांच्या मृत्यूने गावात शोककळा पसरली.

दोघे जण पुरात गेले वाहून

पुलगाव येथील महिला शेतातून परत येत असताना नाल्याला आलेल्या पुर ओलांडताना पुराचा अंदाज न आल्याने पुरात वाहून गेली यात महिला मरण पावल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. तर पिपरी येथील देवानंद गुलाबराव किन्नाके हे नाल्याला आलेल्या पुरात वाहून गेले यात सध्या ते बेपत्ता असल्याने प्रशासनाकडून शोधकार्य सुरू केले आहे.

Vardha Heavy Rainfall
VIDEO : हिमाचलमध्ये पावसाचं थैमान; पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळली चार मजली इमारत

भदाडी नदीच्या तीरावर तब्बल 10 मजूर अडकले, प्रशासनाला वाचवण्यात यश

आज जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला.यामुळे वर्धा -पुलगाव मार्गावरील भदाडी नदीला पुर आला. यात भदाडी नदीच्या तीरावर 10 मजूर अडकले. भदाडी नदीचया बाजूला असलेल्या शेतात कामासाठी गेलेल्या 10 मजूर अडकल्याने प्रशासनाने दोन तासापासून युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू केले होते. त्यानंतर 10 मजुरांना सुखरुप बाहेर काढण्यात आले.यामध्ये एक महिलेची प्रकृती बिघडल्याने त्या महिलेला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.यावेळी स्वतः पोलीस,तहसीलदार नदीच्या पुराच्या पाण्यात उतरून अडकलेल्या मजुरांना वाचवण्यासाठी प्रयत्न केल्याने नागरिकांनी त्यांचे कौतुक केले.

चंद्रपुरात सुद्धा पावसाची जोरदार बॅटींग

चंद्रपूर जिह्यातील टाकळी गावातील नाल्यात पुल ओलांडताना पानवडाळ्याकडे जाणारा ऑटो पाण्याचा प्रवाहात वाहून जाऊ लागला. त्या ऑटो मध्ये पाच प्रवाशी होते.मृत्यूला समीप बघून ते मदतीसाठी आरडाओरडा करू लागले.मात्र पाण्याच्या प्रवाह खूप जोरदार असल्याने कुणीही त्यांना वाचविण्यासाठी हीमंत केली नाही.अश्यात महीण्याभराच्या सूट्टीवर गावाकडं आलेल्या इंडियन आर्मीचे जवान निखिल सुधाकर काळे यांनी थेट पाण्यात उडी घेतली.आपला जीव धोक्यात टाकून या जवानाने पाच लोकांचा जीव वाचविला.देश्यासाठी सिमेवर लढणाऱ्या या जवानाने रजेवर असतांनाही आपले कर्तव बजावले अशी माहिती आमचे प्रतिनिधी अनिल ठाकरे यांनी दिली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com