Pune Rain: पुण्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा
पुण्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उद्यापासून तीन दिवस पुणे आणि घाट माध्यावर अती मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाकडून ऑरेज अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्याच्या विविध भागांमध्ये मागील काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. दोन दिवस पावसाचा जोर कमी झाला होता.
पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांतही मुसळधार पावसाचा अंदाज आहे. सातारा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. तर, कोल्हापूर जिल्ह्याच्या घाटमाथ्यावरही अतिवृष्टीची शक्यता आहे. कोल्हापुरात पंचगंगा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. धरण क्षेत्रात होणारा पाऊस लक्षात घेता नदीच्या पाणीपातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पुण्यात 29 जुलै रोजी 30°C कमाल आणि 21°C किमान तापमान असण्याची शक्यता आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह या भागांतील विविध ठिकाणी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. मुंबईसह उपनगरात हवामान विभागानं जोरदार पावसाची शक्यता वर्तविली आहे.