Rain Update : मुंबई, ठाण्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा

Rain Update : मुंबई, ठाण्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा

परतीच्या पावसाला सुरुवात झाली असून या परतीच्या पावसाने चांगलेच झोडपून काढल्याचे पाहायला मिळत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

परतीच्या पावसाला सुरुवात झाली असून या परतीच्या पावसाने चांगलेच झोडपून काढल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबई आणि उपनगराला परतीच्या पावसाने चांगलेच झोडपले आहे. सगळीकडे पाणीच पाणी झाल्याचे पाहायला मिळत आहे.

काल बुधवारी सकाळपासूनच पावसाने हजेरी लावली संध्याकाळच्या वेळी पावसाचा जोर वाढल्याने त्याचा परिणाम मुंबई लोकलसेवेवर झाल्याचं पाहायला मिळाले. सखल भागात पाणी साचल्याने वाहतूककोंडी झाली होती.

विक्रोळी, कांजूर, भांडुप या स्टेशन दरम्यान पाणी साचल्याने मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली होती. तर घाटकोपर रेल्वे स्थानक परिसरात पाणी साचल्याने स्टेशनवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती. नंतर काही वेळानंतर लोकलसेवा पूर्ववत झाली.

आज देखील मुंबई, ठाण्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आजही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून नागरिकांनो, आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा, असे प्रशासनाकडून नागरिकांना सांगण्यात आले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com