Mumbai Rain: मुंबईसह उपनगरांत मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस

Mumbai Rain: मुंबईसह उपनगरांत मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस

आजही मुंबईत पावसाचा जोर कायम आहे. मुंबईत काल 100 मीमी पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

आजही मुंबईत पावसाचा जोर कायम आहे. मुंबईत काल 100 मीमी पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. हवामान विभागाने आज मुंबईसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. तर रायगड आणि ठाण्यासाठी आज ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. गोव्यात आज ऑरेंज अलर्ट जारी केला असुन संभाव्य पूर येण्याचा इशाराही दिला आहे.

मुंबईसह उपनगरांत मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे आता सखल भागात पाणी साचल्याचं दिसत आहे. दादर, कुर्ला, परळ परिसरात जोरदार पाऊस सध्या सुरु आहे. घाटकोपर,अंधेरी, बोरिवली भागात दमदार पावसाची हजेरी लावली आहे.

ठाणे, नवी मुंबई, पालघरमध्ये संततधार पाऊस आहे. पावसाचा रेल्वे, रस्ते वाहतुकीला फटका बसण्याची शक्यता आहे. तर मुंबईत काल 100 मीमी पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे.

Mumbai Rain: मुंबईसह उपनगरांत मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस
Paris Olympics 2024: इस्त्रायली फुटबॉल संघ ऑलिम्पिकमध्ये खेळणार; FIFA ने संभाव्य बंदीचा निर्णय ढकलला पुढे
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com