Monsoon Updates Live : भिमाशंकर जंगलात भरकटलेले ते सहा जण सापडले

Monsoon Updates Live : भिमाशंकर जंगलात भरकटलेले ते सहा जण सापडले

Heavy Rain : राज्यात आज आषाढीचा उत्साह सुरु असतांना ठिकठिकणी जोरदार पाऊस सुरु आहे. काही ठिकाणी गावांचा संपर्कही तुटला आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरु आहे. कोकणात काही ठिकाणी नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे.

Heavy Rain : राज्यात आज आषाढीचा उत्साह सुरु असतांना ठिकठिकणी जोरदार पाऊस सुरु आहे. काही ठिकाणी गावांचा संपर्कही तुटला आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरु आहे. कोकणात काही ठिकाणी नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे.

पोलिसांना मोठं यश भिमाशंकरमध्ये ट्रेकींसाठी गेलेले 'ते' 6 जण सापडले

भिमाशंकर डोंगरावर ट्रेकींगसाठी गेलेल्या ६ मुलांचा ग्रुप रस्ता चुकल्याने जंगलात भरकटला होता. तरुणांचे मोबाईल बंद असल्यानं लोकेशन काढणं आणि फोन लावणं पोलिसांना शक्य होत नव्हतं. घोडेगाव पोलिसांचा मोठा फौजफाटा जंगलात शोध घेत होता, त्यावेळी त्यांना यश आलं.

भिमाशंकरमध्ये ट्रेकींसाठी गेलेले 6 जण बेपत्ता; पोलिसांकडून शोध सुरु

पुणे : भिमाशंकर डोंगरावर ट्रेकींगसाठी गेलेल्या ६ मुलांचा ग्रुप रस्ता चुकल्याने जंगलात भरकटला आहे. तरुणांचे मोबाईल बंद असल्यानं लोकेशन काढणं आणि फोन लावणं पोलिसांना शक्य होत नाहीये. घोडेगाव पोलिसांचा मोठा फौजफाटा जंगलात तरुणांचा शोध घेत आहे. भरकटलेली मुलं जिल्ह्यातील रहिवासी आहेत. स्थानिकांच्या मदतीने पोलीस ट्रेकरर्सचा शोध घेत असून, पाऊस आणि धुक्यामुळे शोध कामात अडथळे येत आहेत.

गडचिरोलीत जनजीवन विस्कळीत; हवामान खात्याकडून रेड अलर्ट

गडचिरोली जिल्ह्यात हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला. जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूअसल्यानं, जिल्हाधिकारी संजय मिणा यांनी नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे. शाळा-महाविद्यालयं व अन्य संस्थांना तीन दिवस सुटी देण्यात आली आहे. केवळ शासकीय निमशासकीय व अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनीच कर्तव्यस्थळी उपस्थित राहण्याची सूचना केली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील दक्षिण भागाला पुराचा मोठा फटका बसला असून, भामरागड-आलापल्ली 130-D राष्ट्रीय महामार्ग ठप्प झाला आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजूस वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. भामरागड तालुक्यात हेमलकसाजवळ कुमरगुंडा येथे नव्या पुलाच्या बांधकामस्थळी पर्यायी रस्ता वाहून गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. प्रशासनाने पर्यायी रस्त्यावर केलेली डागडुजी देखील सुद्धा वाहून गेली आहे. तर भामरागड येथे नव्या पुलाचं बांधकाम अपूर्ण असल्यानं भामरागड येथे ही वाहतूक ठप्प होण्याची चिन्ह आहेत. जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे.

अडकलेल्या पर्यटकांची सुटका

भंडारदरा धरणाच्या पाणलोटात व कळसुबाई शिखराच्या परीसरात शनिवारी सकाळपासुन अतिवृष्टी होत होती. या शिखरावर अडकलेल्या एकहजार गिर्यारोहकांची सुखरुप सुटका करण्यात आली. या रेस्क्यु ऑपरेशनमध्ये राजुर पोलिसांकडून सहाय्यक पोलिस निरीक्षक नरेंद्र साबळे , पोलिस कर्मचारी अशोक गाढे , विजय फटांगरे व राकेश मुळाने सामिल झाले होते.

गोंदिया जिल्ह्यात मुसळधार

गोंदिया जिल्ह्यात आज दुपारी दिड वाजताच्या सुमारास मुसळधार पावसाने जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे गोंदिया जिल्ह्यातील जनतेला उकाड्यापासून मोठा दिलासा मिळाला तर बळीराजासुद्धा सुखावलेला असून भात रोवणीला मोठ्या प्रमाणात वेग आलेला आहे. मेघगर्जनेसह विजांच्या कडकडासह आलेल्या या पावसामुळे दिवसाच अंधाराचे साम्राज्य पसरले होते. तर या मुसळधार पावसायमुळे नदीनाल्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. या मान्सूनमधील सर्वात जास्त हा पाऊस पडलेला आहे.

धुळ्यात रात्रभर पाऊस

धुळे जिल्ह्यात रात्रभर पासून रिमझिम पाऊस सुरू आहे. कपाशी, मका, सोयाबीन, बाजरी इत्यादी खरीप पिकांना जीवदान देणाऱ्या पावसामुळे शेतकरी आनंद व्यक्त करीत आहेत असाच जिल्ह्यात पावसाचा जोर कायम रहावा आणि तो वाढत राहावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. परंतु जुलै महिना आला परंतु मुसळधार पाऊस धुळे जिल्ह्यात झालेला नाही हवामान विभागाने मोठमोठ्या गप्पा केल्या होत्या परंतु अद्यापही मुसळधार पाऊस हा झालेला नाही. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट जेवून आलो तर ते आता दूर झाले आहे.

पूर पहायला गेले अन पाण्यात बुडाले

शनिवारी मुसळधार आलेल्या पावसामुळे नदी नाल्याना मोठ्या प्रमाणात पूर आला आहे. वर्धा शहरातील नाल्याला आलेला पूर पाहण्यासाठी गेलेले दोन चिमुकले पाण्यात बुडाले आहे. ही घटना वर्धा जिल्ह्याच्या पुलगाव येथे घडली असून बुडालेल्या दोघांपैकी एकाच मृतदेह सापडला आहे तर दुस-याचा शोध सुरु आहे. प्रणय जगताप (वय 14 वर्ष ) आणी आदित्य शिंदे (वय 15 वर्ष ) हे दोघेही गेले होतें. दरम्यान हे दोन्ही चिमुकले पुराच्या पाण्यात सापडल्याने वाहून गेले. यापैकी प्रणय जगताप या मुलाचा मृतदेह सापडला असून आदित्य शिंदे या मुलाच्या मृतदेहाचा शोध प्रशासनाकडून घेतल्या जातं आहे.

सहा जण बेपत्ता

गडचिरोली जिल्ह्यात काल रात्री प्रवास करीत असलेला एक ट्रक पेरमिली नाल्यावरून वाहून गेला. या ट्रकमध्ये पाच ते सहा प्रवासी प्रवास करीत होते.  चालकाचे संतुलन बिघडल्यामुळे ट्रक पाण्यात वाहून गेला. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथक शोध मोहिमेसाठी निघाले आहे मात्र अजूनपर्यंत या 5 ते 6 प्रवाशांचा शोध लागलेला नाही. भामरागड तालुक्यातील पेरमिली या नाल्याजवळ हा ट्रक वाहून गेला.

41 बंधारे पाण्याखाली

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर पुन्हा वाढला

41 बंधारे पाण्याखाली

पंचगंगेच्या पाणी पातळीत 2 फुटांची वाढ

पंचगंगेची पाणीपातळी 32 फूट 7 इंचावर

राधानगरी धरणातून प्रतिसेकंद 1350 क्यूसेकचा विसर्ग सुरू

राधानगरी धरण 50.32 टक्के भरलं

धरण पाणलोट क्षेत्रात धुवादार पाऊस

निम्न वर्धा प्रकल्पाचे ७ तर लाल नाला प्रकल्पाचे ५ दरवाजे उघडले

वर्ध्यातील देवळी ,पुलगाव परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने अनेक नदी नाले दुथडी धरून वाहू लागल्याने चार जण वाहून गेले. धो धो पाऊस बरसल्याने धरणाच्या पाण्याची पातळी वाढ झाली आहे. यात वर्ध्यातील दोन धरणाचे आता दरवाजे उघडण्यात आले आहे. लाल नाला धरणाचे पाच तर निम्न वर्धा प्रकल्पाचे 7 दरवाजे उघडून वर्धा नदी पात्रात पाणी सोडण्यात आले असून नदीच्या तीरावरील गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

सांगलीत संततधार

सांगली - सांगली जिल्ह्यातल्या चांदोली धरण पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी झाली आहे.120 मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद गेल्या 24 तासांमध्ये झाली आहे. त्यामुळे चांदोली धरणाच्या पाणी साठ्यात झपाट्याने वाढ होऊन,16.70 टीएमसी इतका पाणीसाठा निर्माण झाला आहे.तर जिल्ह्यामध्येही पाऊसाचे संततधार कायम आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर पुन्हा वाढला

गेल्या 24 तासापासून कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. त्यातच भारतीय हवामान खात्याने पुढील तीन दिवस ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. सलग सुरू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे 41 बंधारे पाण्याखाली गेल्या असून गेल्या 24 तासात पंचांगेच्या पाणी पातळी दोन फुटांची वाढ झाली आहे तर राधानगरी धरणातून प्रति सेकंद 1350 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे

साताऱ्यात पावसाची संतातधार

सातारा शहरासह जिल्हा गेल्या आठवडाभर पावसाने हजेरी लावली आहे. जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. 12 जुलै पर्यंत पावसाचा जोर राहणार असून येणारे तीन दिवस अतिवृष्टीचे असण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. महाबळेश्वर येथील वेण्णा तलाव तुडुंब भरला असून सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे..जिल्ह्यातील डोंगरकपारीतून कोसळणारे छोटे-मोठे धबधबे फेसाळले असून ते ओसंडून वाहत आहेत. पर्यंटनस्थळांवर पर्यटकांची गर्दी वाढू लागलीये. जिल्ह्यातील प्रमुख धरणांची पाणी पातळीत झपाट्याने वाढत आहे..पश्चिम भागातील डोंगरदऱ्या हिरवाईने नटल्या आहेत.

यवतमाळ : पावसाचा धुमाकूळ

यवतमाळ : जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.झरी तालुक्यातील लिंगती येथील पूल देखील पाण्याखाली गेल्याचे पाहायला मिळत आहे.सद्या लिंगती मुकुटबन परिसराचा संपर्क तुटला आहे.पाणी कमी देखील झाले तरी जो पर्यायी मार्ग बनवण्यात आला होता. तो पूर्ण वाहून गेला आहे. सध्या झरी व मुकुटंबन परिसरात पावसाचा धुमाकूळ सुरू आहे आणि वणी तालुक्याला देखील प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. पुढील दोन ते तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

नंदुरबार जिल्ह्यात जोरदार पाऊस

नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील पूर्वपट्यातील डोंगराच्या पायथ्याशी जोरदार पाऊस झाल्याने मोरकरंजा, पानबारा, बर्डीपाडा येथील नद्यांना पहिलाच पूर आला आहे.जिल्ह्यात सर्वत्र पाऊस सुरू आहे.

चंद्रपुरात मुसळधार

चंद्रपूर जिल्ह्यात पडलेल्या मुसळधार पावसाने मुल शहरातील काही भाग जलमय झाला. श्रमिक नगर व अन्य भागात नगरपालिकेच्या चुकीच्या नियोजनाने नाल्यांचे पाणी घरात आले. या भागातील शेकडो घरांमध्ये नाल्यांमधील पाणी शिरले. मोठ्या पावसानंतर मागील वर्षी देखील या भागाची अशीच अवस्था झाली होती. नगरपालिकेने यावर उपाययोजना करावी यासाठी नागरिकांनी कित्येकदा निवेदने दिली होती. मात्र यावर कुठलीही उपाययोजना झाली नाही. स्थानिक नगर परिषद व प्रशासनावर नागरिकांनी यामुळे रोष व्यक्त केला आहे.सखल भागात पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने निवासी घरे, दुकानं आणि काही मेडिकल यांना या पुराचा मोठा फटका बसला.

सांगलीत आषाढी एकादशीचा उत्साह

सांगलीत आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी

अँकर: सांगलीतही आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. आषाढी एकादशी निमित्त सांगलीतील अनेक विठ्ठल मंदिरात विठुरायाच्या पूजेबरोबर महाप्रसादाचे वाटपही करण्यात आले. अभयनगर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पहाटे विठ्ठल रखुमाईची पूजा करण्यात आली. यानंतर विठ्ठल नामाचा जप करीत टाळ मृदंगाचा ठेका धरत विठ्ठल भक्त आपल्या विठुरायाच्या चरणी विलीन झाले होते. भजन कीर्तन आणि विठ्ठल नामस्मरण तसेच डोकीवर तुळशी वृंदावन घेतलेले बाल वारकरी आशा भक्तिमय वातावरणात सांगलीत आषाढी एकादशी साजरी झाली.

पुणे जिल्ह्यात पावसाची जोरदार बँटींग

पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असून उदापूर येथे संततधार पावसामुळे बनकर फाटा येथे पूर आल्याने शेतकऱ्याच्या बराखीत साठवून ठेवलेला लाखो रूपयांचा कांदा भिजलाय,बनकर फाटा ते ओझर या अष्टविनायक महामार्गालगत असलेल्या दिनेश भास्कर या शेतकऱ्याच्या बराथीत आणि शेतात पुराचे पाणी शिरल्याने भास्कर यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सबंधीत ठेकेदाराने या ठिकाणी महामार्गालगत गटर न खोदल्याने अनेक शेतकय्राचे नुकसान झाल्याचा आरोप शेतकय्रांनी केला असुन आता याकडे प्रशासन लक्ष देऊन सबंधीत शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणार का हे पहाणे आता महत्वाचे असणार आहे.

अमरावतीच्या मेळघाटात जोरदार पाऊस

विदर्भात सध्या जोरदार पावसाची बॅटींग सुरू आहे,अमरावती जिल्ह्यात गेल्या चार ते पाच दिवसापासून दमदार पाऊस पडतो आहे,मुसळधार पावसामुळे धामणगाव रेल्वे तालुक्यातील बोरगाव निस्ताने,सोनोरा काकडे,गोकुळसरा,दिघी महले या गावाबाहेर असलेल्या पुलावरून पाणी असल्याने या ४ गावचा संपर्क सहा तास तुटला रात्री तुटला होता, याच दरम्यान नागापूर येथील बाबासाहेब दरेकर या गुराख्याचा शेतात असताना वीज पडून मृत्यू झाला आहे. याशिवाय निबोली गावामध्ये १२ नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे. मुसळधार पाऊस झाल्याने जिल्ह्यातील शेकडो हेक्टर शेतजमिनी पाण्याखाली आल्यात. त्यामुळे शेतीच देखील मोठ नुकसान झालं आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील दोन दिवस अमरावती विभागात पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com