ताज्या बातम्या
Mumbai Rain: पुढील 2-3 दिवस मुंबई शहर आणि परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज
आज सकाळ पासून जोरदार पाऊस मुंबईत आणि आसपासच्या परिसरात पडत आहे.
मुंबई शहर आणि उपनगरांत गेल्या आठवड्यात मुसळधार पाऊस झाला. त्यानंतर पावसाचा जोर काहीसा ओसरला आहे. मुंबईत सोमवारपासून ढगाळ वातावरण असले तरी काही दिवसांत फारसा पाऊस झालेला नाही.
आज सकाळी आणि मध्यरात्रीपासून मुंबईत आणि काही भागात पाऊस झाला. आज अधून मधून हलक्या सरी कोसळणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. आज सकाळ पासून जोरदार पाऊस मुंबईत आणि आसपासच्या परिसरात पडत आहे. मध्य रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटांनी उशिराने धावत आहेत.
मागच्या काही दिवसांपूर्वी विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा मध्यरात्री पासून जोरदार हजेरी लावली आहे. मात्र आता गुरुवारपासून पुढील दोन-तीन दिवस मुंबई शहर आणि परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.