Haryana and Jammu Kashmir Election Result 2024 : हरियाणा आणि जम्मू काश्मीरमध्ये कुणाची सत्ता? आज लागणार निकाल
जम्मू-काश्मीर, हरियाणातील निवडणुकांचा आज निकाल जाहीर होणार आहे. जम्मू-काश्मीर, हरियाणाचा कौल कुणाला जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तब्बल 10 वर्षांनंतर जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेची निवडणूक झाली.
कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच ही निवडणूक पार पडली. या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते आणि आज या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे.
सर्वात आधी पोस्टल मतांची मोजणी करण्यात येईल. त्यानंतर ईव्हीएममधील मतमोजणीची सुरु करण्यात येईल अशी माहिती मिळत आहे. तब्बल 10 वर्षांनंतर होणाऱ्या या विधानसभेच्या निवडणूकीच्या निकालाकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
एक्झिट पोलनुसार काँग्रेसच्या बाजुने कौल दिसत आहे तर भारतीय जनता पक्षाला धक्का बसण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आता हरियाणात भाजप कायम राहणार की काँग्रेस मुसंडी मारणार? हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.