भाजपला मोठा धक्का, हर्षवर्धन पाटील यांनी हाती  तुतारी; उमेदवारी जाहीर?

भाजपला मोठा धक्का, हर्षवर्धन पाटील यांनी हाती तुतारी; उमेदवारी जाहीर?

राज्यात विधानसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. यातच भाजपला इंदापुरात मोठे खिंडार पडले आहे. इंदापुरातील भाजपचे वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भाजपला रामराम केला आहे.
Published by :
shweta walge
Published on

राज्यात विधानसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. यातच भाजपला इंदापुरात मोठे खिंडार पडले आहे. इंदापुरातील भाजपचे वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भाजपला रामराम केला आहे. हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला आहे.

इंदापूरमध्ये आज शरद पवार गटाची जाहीर सभा पार पडली. या सभेत भाजप नेते हर्षवर्धन पाटील आणि त्यांची मुलगी अंकिता पाटील यांनी शरद पवार गटात जाहीरपणे पक्षप्रवेश केला. या कार्यक्रमाला खासदार अमोल कोल्हे, धैर्यशील मोहिते, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील हे उपस्थित होते. तसेच सुप्रिया सुळे, जयंत पाटील, अमोल कोल्हे, उत्तमराव जानकर हे हजर होते.

शरद पवार गटात पक्षप्रवेश करताच हर्षवर्धन पाटील यांनी जोरदार भाषण केलं, ते म्हणाले की, 10 वर्षात इंदापूरमध्ये खूप अन्याय झाला. कोणतेही काम टक्केवारी दिल्याशिवाय होत नाही. त्यामुळे इंदापुरात परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. काल बिग बॉसचा निर्णय झाला आणि बिग बॉस बारामतीचा झाला. साहेब तुम्ही बिग बॉस आहात. साहेब तुम्ही निर्धास्त राहा आम्ही जबाबदारी स्वीकारतो, असे हर्षवर्धन पाटील यांनी म्हटले.

साहेब कधी आमच्या कुटुंबावर बोलले नाहीत. आम्ही कधी त्यांच्यावर बोललो नाही. आमचं दुखणे वेगळं होतं ते बाजूला गेलं. जयंत पाटील म्हणायचे की थांबला आहात या इकडे. कार्यकर्त्यांनी आग्रह धरला आणि आम्ही सगळ्यांनी पक्ष प्रवेश केला. आम्हाला काही मिळावं म्हणून आम्ही निर्णय घेतला नाही. जी जबाबदारी आमच्यावर टाकायची आहे ती टाका. आत-बाहेर करणाऱ्यांपैकी मी नाही. मला लोकांनी विचारलं पक्ष का बदलला? पक्षापेक्षा जनता श्रेष्ठ. जनतेनं जे मला सांगितलं ते आजपर्यंत मी केलं”, असेही हर्षवर्धन पाटील सांगितलं.

हर्षवर्धन पाटलांच्या उमेदवारीबाबत काय म्हणाले जयंत पाटील?

जागावाटप निर्णय झाल्याशिवाय उमेदवारी जाहीर करता येत नाही. मी त्यांना तुतारी हातात देतोय. कार्यकर्त्यांची चर्चा केली आणि मग तिकडे गेलो इकडे गेलो आता कार्यकर्त्यांची चर्चा नाही हे फायनल आहे, असे म्हणत जयंत पाटील यांनी एकप्रकारे हर्षवर्धन पाटील यांना विधानसभेची उमेदवारी जाहीर केली.

सुधारणा करायला आमच्या मार्गाने यायचं विचार करा. या मतदारसंघातल्या सर्वांना माझा आव्हान आहे की पवार साहेब सामाजिक समतोल ढळू न देता पक्ष चालवतात. इंदापूरमध्ये विजय आवश्यक आहे, म्हणून आम्ही आग्रहाने हर्षवर्धन पाटील यांना निमंत्रित केलं आणि ते आज आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आले, अस जयंत पाटील म्हणाले.

भाजपला मोठा धक्का, हर्षवर्धन पाटील यांनी हाती  तुतारी; उमेदवारी जाहीर?
हर्षवर्धन पाटील यांच्या पक्षप्रवेशाआधी इंदापुरात जोरदार बॅनरबाजी
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com