लोणंद शहरात 321 फूट लांब तिरंग्यासह भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव " हर घर तिरंगा" उपक्रम जनजागृती फेरी

लोणंद शहरात 321 फूट लांब तिरंग्यासह भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव " हर घर तिरंगा" उपक्रम जनजागृती फेरी

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त लोणंद शहरातून 321 फूट लांबीच्या तिरंग्यासह भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव " हर घर तिरंगा" उपक्रम जनजागृती फेरी काढण्यात आली..
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

प्रशांत जगताप, सातारा

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त लोणंद शहरातून 321 फूट लांबीच्या तिरंग्यासह भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव " हर घर तिरंगा" उपक्रम जनजागृती फेरी काढण्यात आली. एव्हरेस्टवीर प्राजित परदेशी मित्र समुहाच्या वतिने भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. लोणंदच्या जिल्हा परिषदेच्या प्राथमीक शाळेतील विध्यार्थी,शिक्षक,एनसीसी,आरएसपी विद्यार्थी-विद्यार्थिनी यांनी या रॅलीत सहभाग घेतला.

भारत माता की जय, वंदे मातरमच्या घोषणा देत लोणंद शहरातून तब्बल 321 फूट लांबीच्या तिरंग्यासह भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव " हर घर तिरंगा" उपक्रम जन जागृती फेरी काढण्यात आली

एव्हरेस्टवीर प्राजित परदेशी यांनी 321 फूट तिरंगा उपलब्ध करून देत त्याचे व्यवस्थापन सादरीकर करण्यासाठी परिश्रम घेतले. लोणंद शहरातून भव्य अशी तिरंगा रॅली काढण्यात आली. यामध्ये 500 विद्यार्थी-विद्यार्थीनीनी सहभाग घेतला. संपूर्ण शहरातुन वंदे मातरम, भारत माता की जयच्या घोषणा आणि मालोजीराजे विद्यालयाच्या बॅन्ड पथकाने नागरिकांचे लक्ष वेधले होते.

लोणंद शहरात 321 फूट लांब तिरंग्यासह भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव " हर घर तिरंगा" उपक्रम जनजागृती फेरी
'हर घर तिरंगा': 'हर घर तिरंगा' मोहिमेअंतर्गत गुजरातमध्ये फडकणार एक कोटी राष्ट्रध्वज, हे ठिकाण असेल खास
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com