Eid-e-Milad: पंतप्रधान मोदींकडून ट्विटरवर पोस्ट शेअर करत मुस्लीम समाजाला ईदच्या शुभेच्छा!
इस्लाम धर्मात ईद मिलाद उन नबी हा दिवस यावर्षी इस्लामिक कॅलेंडरनुसार, ईद मिलाद उन नबी सोमवार, 16 सप्टेंबर रोजी आहे. या दिवशी मुस्लिम बांधव एकमेकांना ईद मिलाद उन नबी च्या शुभेच्छा देतात आणि गळाभेट घेतात. हा दिवस इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित मोहम्मद यांचा जन्मदिवस आहे. मान्यतेनुसार पैगंबर मोहम्मद यांचा जन्म मक्का येथे झाला होता. असे म्हणतात की अल्लाहने हजरत मोहम्मद यांना त्यांचा अवतार म्हणून पाठवले होते. प्रेषित मोहम्मद यांच्या जन्माच्या स्मरणार्थ दरवर्षी ईद-ए-मिलाद-उन-नबी साजरी केली जाते. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत शुभेच्छा दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी ईद-ए-मिलादचे शुभेच्छा देत म्हणाले की, ईद मुबारक! मिलाद-उन-नबी निमित्त हार्दिक शुभेच्छा. सद्भाव आणि एकता सदैव टिकून राहो. सर्वत्र आनंद आणि समृद्धी असू द्या.
असे म्हटले जाते की समाजात पसरलेला अंधार, जुगार, लुटमार यामुळे सर्वजण त्रस्त झाले होते. अशा स्थितीत अल्लाहने मोहम्मद साहिबला पृथ्वीवर पाठवले. मोहम्मद साहिब लहान असतानाच मोहम्मद साहिब यांचे वडील वारले. अशा परिस्थितीत त्यांचे पालनपोषण त्यांचे काका अबू तालिब यांनी केले. हजरत मोहम्मद लहानपणापासून अल्लाहच्या पूजेत मग्न असतं. ते मक्केच्या टेकडीची पूजा देखील करत असतं. जेव्हा ते 40 वर्षांचा झाले तेव्हा त्यांना अल्लाहकडून एक संदेश मिळाला, त्यानंतर त्यांनी अल्लाहचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचवण्यास सुरुवात केली.