Gyanvapi masjid
Gyanvapi masjidTeam Lokshai

Gyanvapi Masjid: सात मागण्या, 45 मिनिटे युक्तीवाद, उद्या फैसला

दोन्ही पक्षकारांचे 19 वकील आणि चार याचिकाकर्ते कोर्टरुममध्ये
Published by :
Team Lokshahi
Published on

वाराणसीच्या न्यायालयाने (court)ज्ञानवापी मशीद (Gyanvapi) प्रकरणातील सर्वेचा अहवाल वाराणसी जिल्हा न्यायालयात (Varanasi district court)सादर करण्यात आला. न्यायालयात सात मुद्यांवर 45 मिनिटे युक्तीवाद चालला. त्यानंतर न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला. आता यावर उद्या निकाल देण्यात येणार आहे.

Gyanvapi masjid
Maharashtra School | राज्यातील शाळा 'या' तारखेपासून होणार सुरु, शिक्षण विभागाकडून वेळापत्रक जाहीर

ज्ञानवापी प्रकरणात दोन्ही पक्षकारांनी एकामागून एक आपली बाजू मांडली. जिल्हा न्यायाधीश डॉ. अजय कृष्ण विश्वेश यांच्या न्यायालयात 45 मिनिटे युक्तीवाद झाला. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकाला. आता यावर निर्णय मंगळवारी (Judgment)देण्यात येणार आहे. या सुनावणीच्या वेळी दोन्ही पक्षकारांचे 19 वकील आणि चार याचिकाकर्ते कोर्टरुममध्ये हजर होते. ज्ञानवापी प्रकरणाशी संबंधित सर्वे अहवाल शनिवारीच कोर्टाला सादर करण्यात आला होता.

हिंदू पक्ष

1. शृंगार गौरीच्या रोजच्या पूजा.

2. वजूखान्यात सापडलेल्या कथित शिवलिंगाची पूजा.

3. नंदीच्या उत्तरेकडील भिंत तोडून डेब्रिज हटवा.

4. शिवलिंगाची लांबी, रुंदी जाणून घेण्यासाठी सर्वेक्षण.

5. वजूखान्यासाठी पर्यायी व्यवस्था

मुस्लिम पक्ष

1. वजूखाना सील करण्यास विरोध

2. ज्ञानवापी सर्वेक्षण आणि 1991 कायद्यांतर्गत प्रकरणावरील प्रश्न

Gyanvapi masjid
सोशल मीडियावर होतेय अभिनेत्री माधुरी पवारच्या टक्कलची चर्चा 

वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीचे (gyanvapi mandir masjid) सर्वेक्षण करण्याच्या वाराणसी न्यायालयाच्या आदेशाविरोधात मुस्लिम पक्षाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने (supreme court)मोठे निर्देश दिले आहेत. ज्या ठिकाणी शिवलिंग (shiv ling)सापडले आहे ती जागा सुरक्षित ठेवावी, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. लोकांना नमाज अदा करण्यापासून रोखू नये, असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com