Gunaratna Sadavarte : सदावर्ते यांचे राजकारणात एन्ट्रीचे संकेत
गेली पाच महिन्यात एसटी कर्मचाऱ्यांचं (St Worker) आंदोलनात सहभागी झालेले एसटी कामगारांचे वकील गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte)यांनी राजकारणात एन्ट्री केली. त्यांनी 'एसटी कष्टकरी जनसंघ' या संघटनेची स्थापना केली असून त्यांनी याबाबतची अधिकृत घोषणा आज केली.
एसटी कामगारांचे वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांना शरद पवारांच्या (Sharad Pawar) घराबाहेर झालेलं एसटी कर्मचाऱ्यांचं राड्या प्रकरणात अटक झाली होती. त्यांना काही दिवसांपूर्वीच जामीनही मिळाला. त्यानंतर ते सक्रिय झाले आहेत. त्यांनी नव्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनेची घोषणा केली आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे गुणरत्न सदावर्ते चर्चेत आले आहेत. 'एसटी कष्टकरी जनसंघ' या नव्या संघटनेची स्थापना करून सदावर्ते यांनी निवडणुकीत उतरण्याचे संकेत दिले. संघटनेची स्थापना केल्यावर ते एसटी महामंडळ बँकेच्या निवडणुकीत स्वत:चं पॅनेल उभा करण्याची शक्यता आहे.
संघटनेत सर्वांचे मार्गदर्शन घेतले जाईल
नवीन संघटना स्थापन केल्यानंतर सदावर्ते म्हणाले की, कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी कोणत्याही धर्माचे जातीचे लोक एकत्र येऊ शकतात. सर्व अभ्यासकांचे नवीन संघटनेत स्वागत आहे. आम्हाला त्यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरणार आहे. आधी जी संघटना आधी होती, तिची मान्यता आता संपली आहे. त्यामुळे त्या संघटनेचे आता कोणीही सभासद नाही. यामुळेच नवीन संघटनेची स्थापना करण्यात आली आहे.