मी एकटाच राहून काय करणार होतो, त्यामुळे...; गुलाबराव पाटलांनी सांगितले शिवसेना सोडण्याचे कारण
गुलाबराव पाटील नेहमीच त्यांच्या वेगवेगळ्या वक्तव्याने चर्चेत असतात. गुलाबराव पाटील जळगाव जिल्ह्यात विकासकामाच्या भूमिपूजन प्रसंगी उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते.
गुलाबराव पाटील म्हणाले की, भागो, आणि मी गेलो. माझ्यावर टीका सुरू झाली, काय झाडी, काय डोंगर अशी अनेक दूषणे आपणास देण्यात आली. पण मी चुकीचा निर्णय घेतला असता, तर आज शिंदे आणि फडणवीस सरकारमध्ये आपण जेवढी कामे मतदारसंघात झाली आहेत. तेवढी कामे झाली नसती. असे पाटील म्हणाले.
यासोबतच ते पुढे म्हणाले की, नागपूर ते मुंबई दरम्यान मी एकटा राहिलो, मी काय करणार होतो? चार खांदेकरी गेल्यानंतर एकटा ‘आग्या’ने काय करावे? म्हणून मी पण निर्णय घेतला. नागपूरपासून तर थेट नाशिक, मुंबईपर्यंतचे शिवसेनेचे सर्व आमदार शिवसेनेला सोडून गेले होते, मी एकटाच राहून काय करणार होतो, त्यामुळे मी सुद्धा गेलो. असे गुलाबराव पाटील म्हणाले.