नेता कितीही चांगला असो कार्यकर्त्यांनी प्रॉब्लेम केला तर ‘कार्यक्रम’ होतोच - गुलाबराव पाटील

नेता कितीही चांगला असो कार्यकर्त्यांनी प्रॉब्लेम केला तर ‘कार्यक्रम’ होतोच - गुलाबराव पाटील

गुलाबराव पाटील चांगला आहे. मात्र त्यांना निवडून दिल्यास कार्यकर्ते उन्माद करतील असं मतदारांना वाटलं. त्यामुळे त्यांनी मला पाडलं.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

गुलाबराव पाटील चांगला आहे. मात्र त्यांना निवडून दिल्यास कार्यकर्ते उन्माद करतील असं मतदारांना वाटलं. त्यामुळे त्यांनी मला पाडलं. त्या निवडणुकीत मी 4 हजार मतांनी पडलो. त्यामुळे नेत्यासोबत कार्यकर्ते देखील चांगले असले तर नेता पुढे जातो. नेता ता चांगला असेल मात्र त्याचे काही कार्यकर्ते अडचणी निर्माण करत असतील तर मोठा कार्यक्रम होऊन जातो. मी ज्यावेळी चार हजार मतांनी पडलो त्याचे मूळ कारण माझे काही कार्यकर्ते होते. त्यावेळी त्यांनी जो उन्माद केला, त्यामुळे मी पराभूत झालो. असे गुलाबराव पाटील म्हणाले.

तसेच राजकारणात नेत्यांची सर्व मदार ही कार्यकर्त्यांवर असते. कार्यकर्ते मेहनती असेल तर नेता मोठा होण्यास वेळ लागत नाही. पण नेता मोठा असेल, तो कितीही चांगला असेल, पण त्याचे कार्यकर्ते चांगले नसतील तर नेत्यांना अडचणी होतातच. राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी नेता आणि कार्यकर्त्यांच्या नेमक्या याच संबंधावर बोट ठेवून कार्यकर्त्यांना कानपिचक्या दिल्या. नेता कितीही चांगला असला पण कार्यकर्त्यांनी प्रॉब्लेम केला तर नेत्याचा कार्यक्रम होतोच, असे देखिल गुलाबराव पाटील म्हणाले.

गाडीचा वेग जर जास्त झाला तर त्यासाठी ब्रेकरची गरज असते. ब्रेकर आल्यानंतर माणूस गाडीबरोबर चालवतो. निवडणुकीत जिंकून येण्याचाच अनुभव नाही तर पडण्याचाही अनुभव असून निवडणुकीत पडल्यानंतर बेटा ठीक से चल नही तो फिर से एक्सिडेंट हो जायेगा हे लक्षात घेऊन मी पण सुधारलो. असे म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांना कानपिचक्या दिल्या.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com