आज गुजरात विधानसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदान
गुजरातमधील विधानसभेच्या ८९ जागांसाठी आज (१ डिसेंबर) पहिल्या टप्प्यात मतदान होत आहे. यावेळी आम आदमी पक्षाने (आप) 181 विधानसभा जागांवर आपले उमेदवार उभे करून ही लढत रंजक बनवली आहे. गुजरातमध्ये गुरुवारी सकाळी ८ ते सायंकाळी ६ या वेळेत मतदान होणार आहे. या जागेवरून आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार इसुदान गढवी रिंगणात आहेत. ही जागा द्वारका जिल्ह्यांतर्गत येते. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने ही जागा जिंकली होती. यावेळी आपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार इसुदान गढवी यांचे भवितव्य पणाला लागले आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानात या जागेची चर्चा जोरात सुरू आहे. एआयएमआयएमनेही या जागेवर आपला उमेदवार उभा केला आहे.
पहिल्या टप्प्याचं मतदान दोत असताना पंतप्रधान मोदींचा अहमदाबादमध्ये मेगा रोड शो आज होणार आहे. अहमदाबादमधील पाच विधानसभा मतदारसंघातून हा रोड शो जाणार आहे. दुपारी 3 ते सायंकाळी 6.30 पर्यंत हा रोड शो असेल. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सानंदमध्ये सकाळी 10.30 वाजता रोड शो करतील. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 2 कोटींहून अधिक मतदार 89 जागांवर मतदान करणार आहेत. कच्छ, सौराष्ट्र आणि दक्षिण गुजरात या जिल्ह्यांमध्ये आज मतदान होत आहे.
1 आणि 5 डिसेंबर रोजी गुजरात विधानसभा निवडणुकांसाठी मतदान पार पडणार आहे. महत्त्वाचं म्हणजे, हिमाचल प्रदेश आणि गुजरात विधानसभा निवडणुकांचा निकाल एकाच दिवशी म्हणजेच, 8 डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे. दरम्यान, भाजपसाठी दोन्ही विधानसभा निवडणुका प्रतिष्ठेच्या आहेत. गेली 25 वर्ष गुजरातमध्ये भाजपची सत्ता आहे. त्यामुळे यंदाही भाजप सत्ता कायम ठेवण्यात यशस्वी होणार का? हे पाहणं महत्ताचं ठरणार आहे.