तिस्ता सेटलवाडला एटीएसने घेतले ताब्यात, एनजीओ प्रकरणी होणार चौकशी
teesta setalvad : गुजरात एटीएसचे एक पथक शनिवारी मुंबईतील सामाजिक कार्यकर्त्या तीस्ता सेटलवाड यांच्या घरी पोहोचले. तेथून त्यांना ताब्यात घेऊन मुंबईतील सांताक्रूझ पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे. सध्या पोलीस ठाण्यात कागदोपत्री काम पूर्ण करण्यात येत आहे. यानंतर एटीएसचे पथक त्याला चौकशीसाठी अहमदाबादला घेऊन जाईल. तिस्ताच्या एनजीओवर काही आरोप आहेत, ज्याचा एटीएसकडून तपास सुरू आहे. या कारवाईच्या एक दिवस आधी सुप्रीम कोर्टाने तीस्ताबाबत आदेश दिला होता. (gujarat ats at teesta setalvad residence in mumbai)
पत्रकार असण्यासोबतच तीस्ता एक सामाजिक कार्यकर्त्या देखील आहेत. 2002 च्या गुजरात दंगलीतील पीडितांना न्याय देण्याचा दावा करणारी संस्था सिटीझन्स फॉर जस्टिस अँड पीस (CJP) च्या त्या सचिव आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह 55 राजकारणी आणि अधिकाऱ्यांना दिलेल्या क्लीन चिटला आव्हान देणारी याचिका झकिया जाफरी यांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली. न्यायालयाने तीस्ताच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
न्यायमूर्ती एएम खानविलकर यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने शुक्रवारी सांगितले की, एसआयटीचा अहवाल स्वीकारताना गुजरात दंडाधिकाऱ्यांनी २०१२ च्या आदेशाला कायम ठेवताना झाकिया जाफरी यांच्या याचिकेत काही तथ्य नाही अस म्हटल आहे. तीस्ता सेटलवाड प्रकरणी अधिक तपासाची गरज आहे कारण ती झाकिया जाफरीच्या भावनांचा तिच्या फायद्यासाठी वापर करत होती. त्यांच्या या वक्तव्यानंतर गुजरात एटीएसने एका दिवसात ताब्यात घेतले आहे.
असे अमित शहा म्हणाले होते
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर गृहमंत्री अमित शहा यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. यावेळी ते म्हणाले की, सुप्रीम कोर्टाने असेही म्हटले आहे की, झाकिया जाफरी दुसऱ्याच्या सांगण्यावरून काम करत होत्या. एनजीओने अनेक पीडितांच्या प्रतिज्ञापत्रांवर स्वाक्षरी केली आणि त्यांना माहितीही नाही. तीस्ता सेटलवाड यांची एनजीओ हे सर्व करत होती हे सर्वांनाच माहीत आहे. काँग्रेसचे सरकार होते, तेव्हा त्यांनी एनजीओला खूप मदत केली होती. अशी माहिती देखील शहा यांनी दिली आहे.