ताज्या बातम्या
Gudi Padwa 2023: तुळजाभवानी मंदिराच्या कळसावर उभारली गुढी
गुढीपाडव्यानिमित्त प्रत्येकजण येणाऱ्या नव्या वर्षाच्या स्वागतासाठी तयारी करत आहेत.
गुढीपाडव्यानिमित्त प्रत्येकजण येणाऱ्या नव्या वर्षाच्या स्वागतासाठी तयारी करत आहेत. साडे तीन शुभ मुहूर्तांपैकी आजचा एक मुहूर्त असल्यानं आणि मराठी नवीन वर्षाचा पहिलाच दिवस आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरात परंपरेनुसार गुढीपाडवा सण साजरा करण्यात आला.
देवीची पहाटे आरती करुन तुळजाभवानी मातेच्या मंदिरावर गुलाबी रंगाच्या साडीची गुढी उभारून भगवा ध्वज लावण्यात आला. गुढी उभारल्यानंतर देवीला साखरेचा हार अर्पण करण्यात आला.
तुळजाभवानीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.नवीन वर्षाचा पहिलाच दिवस असल्यानं देवीची अलंकार पूजा करण्यात आली.