GST Department Raid in Mumbai
GST Department Raid in MumbaiTeam Lokshahi

भिंतीत सापडली 10 कोटींची रोकड, 19 किलो चांदीच्या विटा; झवेरी बाजारात GST विभागाची कारवाई

GST Department Raid in Mumbai : संशयास्पद व्यवहार जीएसटीच्या रडारवर; अनेकांचे धाबे दणाणले
Published by :
Sudhir Kakde
Published on

सोनेव्यापाऱ्याची उलाढाल तीन वर्षात 23 कोटींवरुन 1764 कोटी रुपयांवर; संशयास्पद व्यवहार जीएसटीच्या रडारवर

मुंबई, दि. 22 :- मुंबईच्या झव्हेरी बाजारातील (Zaveri Bazar) मेसर्स चामुंडा बुलीयन (Chamunda Bullion Trader) या कंपनीची उलाढाल वर्ष 2019-20 मध्ये 22.83 कोटी रुपयांवरुन वर्ष 2020-21 मध्ये 652 कोटी आणि वर्ष 2021-22 मध्ये 1764 कोटी रुपयांपर्यंत संशयास्पद वाढल्याचे राज्य जीएसटी विभागाच्या विश्लेषणात लक्षात आल्यानंतर जीएसटी विभागाने टाकलेल्या छाप्यात कंपनीच्या अनेक शाखांची नोंदणी आढळून आली नाही. (GST Department Raid in Mumbai Zaveri Bazar.)

GST Department Raid in Mumbai
"कोणीही मातोश्रीवर येतो अन् टपली मारुन जातो"; राणांच्या वादात राणेंची उडी

कंपनीच्या 35 चौरस मीटरच्या एका छोट्या जागेत जीएसटी विभागाला भिंतीत लपवून ठेवलेली 9 कोटी 78 लाखांची रोकड आणि 13 लाख रुपये किंमतीच्या 19 लाख किलो चांदीच्या विटा आढळून आल्या. राज्य जीएसटी विभागाने सदर जागा सिलबंद केली असून प्राप्तीकर विभागालाही या घटनेची माहिती देण्यात आली आहे.

GST Department Raid in Mumbai
"चंद्र, सुर्य असेपर्यंत..."; गुलाबराव पाटलांनी केलं नितीन गडकरींचं कौतूक

प्राप्तिकर विभागाने सदर रक्कम आणि मालमत्तेचा स्त्रोत शोधण्यास सुरुवात केली आहे. राज्य जीएसटी विभागाने गेल्या काही महिन्यांपासून जीएसटी चोरी शोधणे आणि कारवाईची मोहिम तीव्र केली असून हजारो कोटींची जीएसटी चोरी शोधण्यात यश मिळविले आहे. राज्य करविभागाचे सहआयुक्त राहूल द्विवेदी, उपायुक्त विनोद देसाई यांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. जीएसटी चोरीविरुद्धची कारवाई या पुढच्या काळात अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे राज्य कर विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com