ग्रीसच्या जंगलांना भीषण आग; हजारो लोकांना सुरक्षित स्थळी हलवले

ग्रीसच्या जंगलांना भीषण आग; हजारो लोकांना सुरक्षित स्थळी हलवले

गेल्या काही दिवसांपासून देशात अतिवृष्टी सुरु असून अनेक भागांत पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र, दुसरीकडे ग्रीसमधील जंगले आगीच्या भक्ष्यस्थानी पडत आहेत.
Published on

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून देशात अतिवृष्टी सुरु आहे. अनेक भागांसाठी हा पहिलाच पाऊस आहे. उशिराने दाखल झालेल्या पावसाने अनेक भागांत पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र, दुसरीकडे जगाच्या पाठीवर युरोपातील ग्रीस सध्या उष्णतेची लाट पसरली आहे. यामुळे ग्रीसमधील जंगले आगीच्या भक्ष्यस्थानी पडत आहेत. आगीने उग्र रूप धारण केल्याने हजारो लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

ग्रीसच्या जंगलांना भीषण आग; हजारो लोकांना सुरक्षित स्थळी हलवले
लक्षवेधी पुढे ढकलली जयंत पाटील आणि बाळासाहेब थोरात संतापले

ग्रीसमधील जंगलात मागील आठवडाभरापासून ही आग लागली असून यावर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न युध्दपातळीवर सुरू आहेत. परंतु, आग आटोक्यात येत नसल्याने स्थानिक आणि पर्यटकांसह 30,000 हून अधिक लोकांना स्थलांतरित करण्यात आले आहे. ग्रीसमध्ये लागलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी आग असल्याचे सांगितले आहे. यामध्ये प्रामुख्याने रोड्स आणि कॉर्फू या बेटांना सर्वाधिक फटका बसला आहे.

युरोपीय देश पर्यटनासाठी प्रसिद्ध आहेत. यापैकी ग्रीसचे रोड्स बेट हे प्रमुख आकर्षण आहे. अल जझीराच्या अहवालानुसार, 2022 मध्ये सुमारे 2.5 दशलक्ष पर्यटकांनी रोड आयलंडला भेट दिली. या बेटांवर अजूनही हजारो पर्यटक होते, यामुळे सरकारला मोठ्या प्रमाणावर बचाव मोहिम सुरू केली. याशिवाय क्रोएशिया, फ्रान्स, स्लोव्हाकिया आणि तुर्की हे देशही बचावकार्यात मदत करत आहेत. या वणव्यामुळे रोड्स आयलंडला जाणारी अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.

दरम्यान, 2023 मध्ये जगभरात जंगलाला आग लागण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. कॅनडा, अमेरिका, दक्षिण अमेरिका, कझाकिस्तान, ऑस्ट्रेलिया अशा अनेक देशांमध्ये लाखो एकर वनक्षेत्र नष्ट झाले आहे. उष्णतेच्या लाटा हे या आगींचे मुख्य कारण असल्याचे मानले जात आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com