मंत्री दिपक केसरकरांना धक्का; ठाकरे गटाचा दोन ग्रामपंचायतींवर विजय
ग्रामपंचायतींचा निकाल आज जाहीर होत असून सकाळी आठ वाजल्यापासून अनेक ठिकाणी मतमोजणीला सुरुवात झाली आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष बाजी मारतात की सत्ताधारी शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टी सर्वाधिक जागा मिळवते. याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. तालुक्यात पहिल्या टप्प्यातील ग्रामपंचायत निवडणूक निकाल लागले असून आजगाव भोमवाडी ग्रामपंचायतमध्ये ठाकरे गटानं खातं उघडलं आहे.
आजगाव भोमवाडी ग्रामपंचायतमध्ये ठाकरे गटानं खातं उघडलं आहे. जिल्ह्यात प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या सावंतवाडी तालुक्यातील केसरी ग्रामपंचायतवर भाजपने वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. गावविकास पॅनेल ने गुळदुवे व निरगुडे गाव विकास पॅनेलने ग्रामपंचायतीवर तसेच शिवसेना ठाकरे गटाने भोमवाडी तसेच सातार्डा ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळवलं आहे.
सावंतवाडी तालुक्यातील पहिल्या टप्प्यात दहा ग्रामपंचायतचे निकाल जाहीर झाले असून यामध्ये मडूरा केसरी शिरशिंगे पडवे माजगाव या ग्रामपंचायतवर भाजपने वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. या ग्रामपंचायत निवडणुकीत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर व बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.