दहीहंडी उत्सवाला गालबोट; मुंबईत दहीहंडी फोडताना 'एवढे' गोविंदा झाले जखमी

दहीहंडी उत्सवाला गालबोट; मुंबईत दहीहंडी फोडताना 'एवढे' गोविंदा झाले जखमी

दहिहंडी साजरी करताना उभारलेले मानवी मनोरे कोसळून मंगळवारी 27 ऑगस्ट रोजी 206 गोविंदा जखमी झाले.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

दहिहंडी साजरी करताना उभारलेले मानवी मनोरे कोसळून मंगळवारी 27 ऑगस्ट रोजी 206 गोविंदा जखमी झाले. यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. एकाच्या मानेला तर दुसऱ्याच्या मणक्याला लागले आहे. तसेच सर्व गोविंदांवर नजीकच्या रुग्णालयात उपचार करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, 24 वर ओपीडीमध्ये उपचार सुरू आहेत, 157 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

जे.जे.रुग्णालयातून तिघांना डिस्चार्ज देण्यात आला तर सेंट जॉर्ज रुग्णालयात तीन रुग्ण दाखल झाले होते. यातील एकाला डिस्चार्ज देण्यात आला असून दोघांवर ओपीडीमध्ये उपचार सुरू आहेत. पोद्दार रुग्णालयात दाखल झालेल्या 18 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. जी टी रुग्णालयातून 5 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. केईएम रुग्णालयात 7 जणांवर उपचार सुरू असून 39 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

दरवर्षी दहीहंडी उत्सव साजरा करताना एकीकडे गोविंदांचा जल्लोष असतो, दहिहंडी फोडून प्रथम, द्वितीय, तृतीय पारितोषिक मिळविल्याची आनंद ओसंडून वाहत असतो, तर दुसरीकडे आपला जवळचा सहकारी, आपला मित्र, भाऊ, दादा, काका, मामा दहिहंडी फोडताना जखमी झाला असून रुग्णालयात उपचार घेत असल्याची आंतरिक जाणीव असते. अशा परिस्थितीतही मुंबईकर गोविंदा दहिहंडी उत्सव साजरा करीत असतात.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com