Rajyapal Bhagat Singh Koshyari
Rajyapal Bhagat Singh KoshyariTeam Lokshahi

राज्यपाल पुन्हा वादात, छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख? मिटकरींनी दाखवला Video

मागच्या काही दिवसांपासून महापुरुषांबाबत केलेल्या विधानांमुळे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी अडचणीत आले होते. तर पुन्हा एकदा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विधानावरुन नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
Published by :
shweta walge
Published on

मागच्या काही दिवसांपासून महापुरुषांबाबत केलेल्या विधानांमुळे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी अडचणीत आले होते. तर पुन्हा एकदा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विधानावरुन नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी ट्वीट केला आहे.

अमोल मिटकरी यांच ट्वीट

'राज्यपाल महोदयांकडून मुंबई येथे राजभवनातील कार्यक्रमात परत एकदा छत्रपती शिवाजी महाराज व इतर महापुरुषांचा एकेरी उल्लेख ! नेमके राज्यपालांच्या मनात चाललंय तरी काय ? आता तरी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी याबाबत खुलासा करतील का?', असा सवाल अमोल मिटकरी यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना विचारला आहे.

राज्यपालांचं नेमकं वक्तव्य काय?

राज्यपालांनी हिंदीत वक्तव्य केल्याचं व्हिडीओत दिसत आहे. “सब लोग कहते हैं की शिवाजी होने चाहीए, चंद्रशेखर होने चाहीए, भगतसिंह होने चाहीए, नेताजी होने चाहीए, लेकीन मेरे घरमें नही तो दुसरे के घरमे होने चाहीए”, असं विधान राज्यपाल संबंधित व्हिडीओत करताना दिसत आहेत.

Rajyapal Bhagat Singh Koshyari
“दीड फुटाच्या आमदाराची जीभ…” नितेश राणेंवर विद्या चव्हाणांची जोरदार टीका

याच कार्यक्रमात बोलताना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आणखी एक वक्तव्य केलं, त्यामुळे त्यांना उत्तराखंडमध्ये परतण्याचे वेध लागले आहेत का? अशा चर्चा सुरू झाल्या. राज्यपाल बनणं म्हणजे सर्व दु:खच दु:ख आहे, सुख काहीच नाही, असं राज्यपाल भगतसिंग कोश्यारी म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com