Wardha: वर्ध्यातील शासकीय आयटीआयला 'या' नावाने ओळखले जाणार; सुमित वानखेडेच्या प्रयत्नाला यश
भूपेश बारंगे | वर्धा: वर्ध्यातील कारंजा व सेलू येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्राला संतांच्या नावाची मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. वर्ध्यातील सेलू व कारंजा येथील औद्योगिक प्रशिक्षण केंद्र आहे.सन 1999 मध्ये मंजूर झालेल्या शासकीय आयटीआयला नाव मिळवावे म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय सुमित वानखेडे यांनी प्रयत्न केले होते.वानखेडे यांनी कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्याकडे मागणी केली.त्यानंतर सोमवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मंजुरी दिली आहे.कारंजा येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्राला चक्रवर्ती राजा भोज यांचे नाव देण्यात आले आहे.तर सेलू येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्राला संत जगनाडे महाराजांचे नाव देण्याची मंजुरी मिळाली आहे.
वर्ध्याच्या कारंजा( घाडगे) तालुक्यात भोयर-पवार यांची बहुसंख्य ना राजधानी असल्याने या जातीचे दैवत असलेले 'चक्रवर्ती राजा भोज' यांचे नाव मिळाले आहे.जिल्ह्यात बहुसंख्य असलेला तेली समाजा यांचे दैवत असलेले 'संत जगनाडे महाराज' यांचे नाव सेलू येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्राला 'संत जगनाडे महाराज' अस नाव देण्यात आले आहे.दोन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्राला नाव मिळाल्याने बहुसंख्य असलेल्या दोन्ही समाजात आनंदाचे वातावरण आहे.यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय, वर्धा लोकसभा प्रमुख सुमित वानखेडे यांनी संतांचे नाव मिळवण्यासाठी प्रयत्न केले.त्यांच्या प्रयत्नाला यश आले असून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. दोन्ही समाजाकडून आभार मानले जात आहे.
आर्वी मतदारसंघात कारंजा या तालुक्यात बहुसंख्य असलेला भोयर-पवार समाज आहे.त्यामुळे कारंजा तालुका भोयर -पवारांची राजधानी म्हणून ओळखले जाते.आता पर्यंत या समाजाचे दैवत असलेले 'चक्रवर्ती राजा भोज' यांचे कोणीही उल्लेख करत नव्हते,मात्र भाजपचे सुमित वानखेडे यांनी याकडे लक्ष वेधून या समाजाचे दैवत असलेल्या 'चक्रवर्ती राजा भोज'चे नाव शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्राला नाव मिळाल्याने सुमित वानखेडे यांच्यावर सोशल मीडियावर कौतुकाची थाप पडत आहे.या समाजाला एकप्रकारे न्याय देण्यात आला असल्याचे बोलले जात आहे.