कंत्राटी भरतीचा शासन निर्णय अखेर रद्द

कंत्राटी भरतीचा शासन निर्णय अखेर रद्द

कंत्राटी भरतीचा शासन निर्णय अखेर राज्य सरकारने रद्द केला आहे.
Published by :
shweta walge
Published on

कंत्राटी भरतीचा शासन निर्णय अखेर राज्य सरकारने रद्द केला आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत नवीन शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे.

कंत्राटी भरतीच्या निर्णयावरून राज्यात ठिकठिकाणी आंदोलने झाली होती आणि विरोधी पक्ष नेत्यांनीही राज्य सरकारला लक्ष्य केले होते. यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील कंत्राटी भरतीचा शासन निर्णय आम्ही रद्द करत आहोत, असं सांगितलं होतं.

कंत्राटी भरती हे मुळात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे पाप आहे. या भरतीवरून तेच राज्यात असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत, तसेच कंत्राटी नोकरभरतीची प्रक्रिया महाविकास आघाडी सरकारच्याच काळात पूर्ण झाली होती. उद्धव ठाकरे यांच्याच सरकारचा जीआर आहे, असे सांगत आधीच्या सरकारच्या या पापाचे ओझे आपण का उचलायचे, असा सवाल करत पाप त्यांनीच करायचे आणि त्याचे खापर आमच्या माथ्यावर फोडायचे हे योग्य नाही. त्यामुळे कंत्राटी भरतीचे धोरण आम्हाला मान्य नसल्याने कंत्राटी भरतीचा शासन निर्णय आम्ही रद्द करण्याचा निर्णय घेतला असल्याची घोषणा फडणवीस यांनी केली होती.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com