Gopichand Padalkar
Gopichand PadalkarTeam Lokshahi

गोपीचंद पडळकरांच्या भावासह 100 जणांवर गुन्हा दाखल

मिरज शहरातील स्टँड जवळचे दोन हॉटेल, एक मेडिकल स्टोर, ट्रॅव्हल, ऑफिस, एक घर, पान शॉप अशा सात मिळकती मध्यरात्री जेसीबीच्या साह्यायाने पाडण्यात आल्याचा आरोप भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकरांवर आहे.
Published by :
shweta walge
Published on

मिरज शहरातील स्टँड जवळचे दोन हॉटेल, एक मेडिकल स्टोर, ट्रॅव्हल, ऑफिस, एक घर, पान शॉप अशा सात मिळकती मध्यरात्री जेसीबीच्या साह्यायाने पाडण्यात आल्याचा आरोप भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकरांवर आहे. या प्रकरणी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे भाऊ ब्रह्मानंद पडळकर यांच्यासह 100 जणांवर मिरज शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे.

ब्रह्मानंद पडळकर यांनी बेकायदेशीरपणे जागेचा ताबा घेण्याच्या उद्देशाने सात मिळकती पाडल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. घटनेप्रकरणी सांगली जिल्हा परिषदेचे माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर यांच्यासह 100 जणांवर मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

बेकायदेशीर जमाव जमवून मालमत्तेचे नुकसान केलं. बेकायदेशीरपणे लोकांच्या मालमत्तेत घुसून नुकसान करणे, लोकांना मारहाण करणे. नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण केला. 12 कलमाद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रस्त्या शेजारील दोन हॉटेल, एक मेडिकल स्टोर, ट्रॅव्हल, ऑफिस, एक घर, पान शॉप अशा सात मिळकती पाडण्यात आल्या आहेत. मध्यरात्री जेसीबीच्या साह्यायाने दुकानं आणि घर पाडली आहेत. हजार लोकांच्या साह्यायाने जागेचा ताबा घेण्यासाठी पडळकर आले होते, असा आरोप नागरिकांनी केला आहे.

Gopichand Padalkar
जेसीबीच्या साह्याने अतिक्रमण काढलं, हे संपूर्ण कायदेशीर आहे; गोपीचंद पडळकर
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com