मिरजेत हॉटेलचं पाडकाम, गोपीचंद पडळकर यांच्या भावावर गंभीर आरोप
मिरज शहरातील स्टँड जवळचे दोन हॉटेल, एक मेडिकल स्टोर, ट्रॅव्हल, ऑफिस, एक घर, पान शॉप अशा सात मिळकती मध्यरात्री जेसीबीच्या साह्यायाने पाडण्यात आल्याचा आरोप भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकरांवर आहे. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात असून, स्थानिकांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरूय. दरम्यान ब्रह्मानंद पडळकर हे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू आहेत.
आमदार गोपीचंद पडळकर आणि त्यांचे भाऊ ब्राह्मनंद पडळकर यांनी जे बांधकाम पाडले आहे ते चुकीचं आहे, असा आरोप करण्यात आला आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी संतप्त नागरिक करत आहेत. मिरजमधील वातावरण सध्या चांगलंच तापलं आहे. त्यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे.
जर आज दुपारी 12 वाजेच्या आधी या सगळ्यांवर गुन्हे दाखल झाले नाहीत तर आम्ही सगळे लोक आमच्या कुटुंबासह सुरेश खाडे यांच्या कार्यालयाबाहेर उपोषण करू, असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.