गोपाळ शेट्टींना बोरिवली पोलिसांनी घेतलं ताब्यात; कारण काय?

गोपाळ शेट्टींना बोरिवली पोलिसांनी घेतलं ताब्यात; कारण काय?

माजी खासदार गोपाळ शेट्टी यांना बोरिवली पोलिसांनी आंदोलनाच्या ठिकाणावरून ताब्यात घेतले. विकासकाच्या दबावामुळे महानगरपालिकेच्या कर्मचारी विष्णू निवास चाळीतील विज आणि पाणी सेवा खंडित करण्यासाठी आल्याचे उघड झाले.
Published by :
shweta walge
Published on

माजी खासदार गोपाल शेट्टी यांना बोरिवली पोलिसांनी आंदोलनाच्या ठिकाणावरून ताब्यात घेतले. बोरिवली पश्चिम येथील विष्णू निवास चाळमध्ये जमीन मालक आणि विकासकाने स्थानिकांना त्रास देण्याचा आरोप आहे. माहितीनुसार, विकासकाने महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांवर दबाव टाकून चाळीतील पाणी आणि वीज सेवा खंडित करण्यासाठी पाठवले. गोपाल शेट्टी यांनी तातडीने हस्तक्षेप करून संबंधित कर्मचार्यांशी संवाद साधला आणि विकासकाच्या दबावाबद्दल माहिती मिळवली.

बोरिवली पश्चिम आर एम भट्ट रोड विष्णू निवास चाळ हरिदास नगर बोरिवली पश्चिम, मुंबई येथे आहे. ज्यामध्ये जमीन मालकासह विकासक मनमानी पणे तेथील लोकांना त्रास देत आहे. एवढेच नाही तर मिळालेल्या माहितीनुसार, आज विकासकाने महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर दबाव आणला आणि काही महानगरपालिका कर्मचाऱ्यांना विष्णू निवास येथे पाणीचे सेवा खंडित करण्यासाठी पाठवले. माहिती मिळताच माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी तातडीने विष्णू निवास चाळ आणि आलेल्या महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना गाठले. त्यांच्याकडून माहिती घेतली विकासकाच्या दबावामुळे महानगरपालिकेच्या कर्मचारी विष्णू निवास चाळीतील विज आणि पाणी सेवा करण्यासाठी आल्याचे संभाषण दरम्यान उघड झाले. जेणेकरून विकासकाला फायदा होईल.

माजी खासदार गोपाळ शेट्टी म्हणाले, मी पदावर असतानाही जनतेसाठी काम करायचो आणि आता पदावर नसलो तरी जनतेचे प्रश्न सोडवत राहीन. एवढेच नाही तर जोपर्यंत विष्णू निवास चाळीचा प्रश्न सुटत नाही. यासाठी विकासक आणि महानगरपालिका कर्मचाऱ्यांवर माझी कारवाई सुरूच राहणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com