पेट्रोल पंपावर पेट्रोल ऐवजी पाण्याची विक्री, वाहनं बंद पडत असल्याने प्रकार उघडकीस
गोंदिया जिल्ह्यातील आमगाव येथील रिया फ्युल स्टेशन या नावाने असलेल्या ऐसार कंपनीच्या पेट्रोल पंपावर वाहन ग्राहकांनी वाहनांमध्ये पेट्रोल भरून वाहन चालविली परंतु वाहने काही अंतरावर गेल्यावर वाहने बंद पडत असल्याची तक्रारी पुढे आल्या. यात वाहन चालकांनी वाहने मैकेनिककडे तपासल्यावर टॅंक मध्ये पेट्रोल नसून पाणी असल्याचे पुढे आले, यावर वाहन धारकांनी पेट्रोल पंपावर धाव घेऊन तपासले असता पेट्रोल ऐवजी पाणीच विक्री होत असल्याचे निदर्शनास
तर अनेक वाहनधारकांनी पेट्रोल हे बाटलीत घेतले व पाहणी केली तर काय पेट्रोलच्या ऐवजी सरळ पाणीच विक्री होत असल्याचे पुढे दिसून आले. यावेळी तक्रार करूनही पाणीची विक्री सुरूच होती शेवटी तहसीलदार आमगाव व ऐसार कंपनीच्या टोल फ़्री क्रमांकावर ग्राहकांनी तक्रार करताच तहसील अधिकारी यांनी पंचनामा करून पंप बंद केले .परंतु पंप चालकाने 3 मात्र मात्र पेट्रोल ऐवजी पाण्याची विक्री करून मात्र वाहनधारकांची लूट केली. आता कंपनी व प्रशासन या पंपचालकांवर काय कारवाई करते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल