सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदी-विक्रीसंदर्भात सरकारचा मोठा निर्णय; नवीन नियम लागू

सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदी-विक्रीसंदर्भात सरकारचा मोठा निर्णय; नवीन नियम लागू

सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदी-विक्रीसंदर्भात सरकारचा मोठा निर्णय; आता हॉलमार्किंगशिवाय दागिने विकले जाणार नाहीत. २३ जून २०२१ पासून हॉलमार्किंगचा नियम लागू झाला आहे.
Published by :
shweta walge
Published on

देशात आजही अनेक ठिकाणी हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जात आहेत. यासंदर्भात, सरकारने जाहीर केले आहे की, आता वेगवेगळ्या राज्यांतील हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत. दरम्यान, २३ जून २०२१ पासून हॉलमार्किंगचा नियम लागू झाला आहे. आतापर्यंत जवळपास ४० कोटी सोन्याचे दागिने हॉलमार्क करण्यात आले आहेत.

भारत सरकार आता देशाच्या विविध भागात भेसळयुक्त सोन्याच्या दागिन्यांपासून लोकांचे संरक्षण करण्यासाठी दागिन्यांवर हॉलमार्किंगचा नियम लागू करत आहे. हा नियम देशात २३ जून २०२१ रोजीच करण्यात आला. परंतु, त्याची टप्प्याटप्प्याने विविध जिल्ह्यांमध्ये अंमलबजावणी सुरू आहे. आंध्र प्रदेश, बिहार, हरयाणा, हिमाचल प्रदेश, केरळ, ओडिशा, पुद्दुचेरी, राजस्थान, तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये आहेत. याचबरोबर, आता देशात ३६२ असे जिल्हे आहेत, जेथे हॉलमार्किंगशिवाय दागिने आणि सोन्याच्या कलाकृती दागिन्यांच्या दुकानात विकल्या जाणार नाहीत.

ॲपद्वारे तुम्ही हॉलमार्क केलेले सोने ओळखू शकतात

तुमच्याकडे हॉलमार्किंग असलेले कोणतेही दागिने असल्यास, परंतु ते योग्य हॉलमार्किंग आहे की नाही. याबद्दल तुम्हाला शंका असल्यास, तुम्ही बीआयएस केअर मोबाइल ॲपद्वारे ते ओळखू शकतात. खरे तर, या ॲपचा वापर करून, ग्राहक हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दागिन्यांची सत्यता पडताळू शकतो आणि उत्पादनाच्या गुणवत्तेबद्दल किंवा बीआयएस मार्कच्या गैरवापराबद्दल त्याची तक्रार देखील नोंदवू शकतो.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com