पंतप्रधानांच्या वाढदिवशी जन्माला येणाऱ्या बाळांना दिली जाणार सोन्याची अंगठी

पंतप्रधानांच्या वाढदिवशी जन्माला येणाऱ्या बाळांना दिली जाणार सोन्याची अंगठी

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज वाढदिवस आहे. सगळ्या स्तरातून त्यांच्यावर वाढदिवसाच्या दिवशी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. याच मोदींच्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर 'सेवा पंधरवडा' शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून देशभरात साजरा करण्याची जय्यत तयारी सुरु करण्यात आली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज वाढदिवस आहे. सगळ्या स्तरातून त्यांच्यावर वाढदिवसाच्या दिवशी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. याच मोदींच्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर 'सेवा पंधरवडा' शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून देशभरात साजरा करण्याची जय्यत तयारी सुरु करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर तामिळनाडूमध्ये मोदींच्या वाढदिवसानिमित्त खास आणि वेगळे सेलिब्रेशन पाहायला मिळत आहे.

तामिळनाडूमध्ये भाजपाच्या वतीने १७ सप्टेंबरला जमनाला येणाऱ्या नवजात बालकांना चक्क सोन्याची अंगठी देण्यात येणार आहे. याबरोबरच तब्बल ७२० किलोचे मासेही वाटले जाणार आहेत. याची माहिती मत्स्य पालन आणि सूचना व प्रसारण राज्य मंत्री एल मुरुगन यांनी दिली आहे.

एल मुरुगन यांनी सांगितले की, चेन्नईस्थित आरएसआरएम हे शासकीय रुग्णालय यासाठी निवडण्यात आले आहे. आरएसआरएम शासकीय रुग्णालयात जन्माला येणाऱ्या नवजात बालकांना भेट म्हणून सोन्याची अंगठी देण्यात येणार आहे. प्रत्येक अंगठी जवळपास २ ग्रामची असेल आणि तिची किंमत पाच हजार रुपये इतकी असेल. व ‘ही भेट देऊन आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनी जन्माला येणाऱ्या बालकांचे स्वागत करायचे आहे. असे सांगितले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com