एसटी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता द्या! मुख्यमंत्र्यांच्या परिवहन खात्याला सूचना
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एसटी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता देण्यात येणार असून तशा सूचनाही जारी करण्यात आल्या आहेत. एसटी कर्मचारी संघटनांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी महागाई भत्ता देण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यानंतर शुक्रवारी रात्री सह्याद्री अतिथीगृहावर एक बैठक पार पडली. या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता देण्याचे आदेश देण्यात आले.
महागाई भत्ता देण्याचं आश्वासन देण्यात आलं असल्याची माहिती एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी दिली. एसटी कामगार संघटनेच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सूचना दिल्या. परिवहन खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष सिंह यांना फोनवरून कर्मचाऱ्यांचे डीए देण्याचे आदेश देण्यात आलेत.
आता काही दिवसांपूर्वीच एसटी कर्मचारी संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री शिंदे यांना निवेदनाद्वारे काही मागण्या करण्यात आल्या होत्या. महागाई भत्ता देण्यात यावा, हजारो एसटी कर्मचाऱ्यांचं वेतन निश्चित केलं जावं, याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत एसटी कर्मचारी संघटनेची बैठक पार पडली. या बैठकीत आता एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता देण्याबाबतच्या सूचना एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.