बोपदेव घाट सामूहिक अत्याचार प्रकरण; आरोपींनी पोलिसांना दाखवलं घटनास्थळ

बोपदेव घाट सामूहिक अत्याचार प्रकरण; आरोपींनी पोलिसांना दाखवलं घटनास्थळ

कोंढवा परिसरात तरुणीवर सामूहिक बलात्काराची घटना घडली.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

अमोल धर्माधिकारी, पुणे

कोंढवा परिसरात तरुणीवर सामूहिक बलात्काराची घटना घडली. कोंढव्यातील बोपदेव घाट परिसरात तरुणीवर तिघांकडून लैंगिक अत्याचार करण्यात आला. गुरुवारी रात्री 11च्या सुमारास ही घटना घडली. याच पार्श्वभूमीवर आता आरोपीने पोलिसांना अत्याचार केलेले घटनास्थळ दाखवले असल्याची माहिती मिळत आहे.

या प्रकरणात आरोपीने पीडित मुलगी आणि त्याच्या मित्राला धमकावण्यासाठी वापरलेले दांडके व त्याचे कपडे पोलिसांनी जप्त केलं आहे. चंद्रकुमार कनोजिया असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार अख्तर शेख याला उत्तर प्रदेशमधून ताब्यात घेतले मात्र त्याला अद्याप न्यायालयात हजर करण्यात आले नाही आहे. आणखी एका आरोपीचा पुणे पोलिसांकडून अद्याप शोध सुरु आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com