पुण्यातील बोपदेव घाट सामूहिक अत्याचार प्रकरण; या घटनेचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग
कोंढवा परिसरात तरुणीवर सामूहिक बलात्काराची घटना घडली. कोंढव्यातील बोपदेव घाट परिसरात तरुणीवर तिघांकडून लैंगिक अत्याचार करण्यात आला. गुरुवारी रात्री 11च्या सुमारास ही घटना घडली. पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घटनेची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर आरोपींचा शोध घेणं सुरू होते.
आरोपींच्या शोधासाठी आणि अटक करण्यासाठी गुन्हे शाखा आणि डीबीची दहा पथके नेमण्यात आली होती. तसेच या प्रकरणात आत्तापर्यंत दोनशेहून अधिक संशयितांची चौकशी करण्यात आली होती.
याच पार्श्वभूमीवर आता या घटनेचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त आमितेश कुमार यांनी दिली. या घटनेतील एक आरोपी अटकेत तर अन्य दोघांचा शोध सुरु तिघे ही आरोपी मध्य प्रदेशातील असून पुण्यात कचरा वेचण्याच काम करायचे. अटक केलेल्या आरोपीचं नाव चंद्रकुमार कनोजिया असल्याची माहिती मिळत आहे.