महागाईचा आलेख वाढतच चालला आहे. महागाईमुळे सामान्यांच्या खिशाला चांगलीच कात्री बसली आहे. यासर्व महागाईचा त्रास सामन्यांना होत आहे. मात्र आता सर्वसामान्यांना सणासुदीच्या दरम्यान काहीसा दिलासा मिळणार आहे.
येत्या काही दिवसांत तूप आणि लोणीच्या दरात मोठी कपात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या तूप आणि लोणी या दोन्ही पदार्थांवर 12-12 टक्के दराने जीएसटी आकारला जातो. केंद्र सरकार हा जीएसटी कर 5-5 टक्क्यांपर्यंत कमी करु शकते.
एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार तूप आणि लोणीवरील जीएसटी कमी करण्याचा प्रस्ताव सरकार मांडणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळू शकतो.