NIA Raids: NIAच्या छापेमारीत घाटकोपर ट्रेन ब्लास्टचा आरोपी अटकेत

NIA Raids: NIAच्या छापेमारीत घाटकोपर ट्रेन ब्लास्टचा आरोपी अटकेत

राष्ट्रीय तपास एजन्सी (NIA) आणि दहशतवादी विरोधी पथकाकडून (ATS) राज्यभरात ४४ ठिकाणी तर कर्नाटकात एका ठिकाणी छापेमारी करण्यात आली.
Published by :
shweta walge
Published on

राष्ट्रीय तपास एजन्सी (NIA) आणि दहशतवादी विरोधी पथकाकडून (ATS) राज्यभरात ४४ ठिकाणी तर कर्नाटकात एका ठिकाणी छापेमारी करण्यात आली. यामध्ये १५ संशयित दहशतवाद्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. तर घाटकोपर बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी साकिब नाचन याला एनआयएने ताब्यात घेतले आहे.

यामध्ये घाटकोपर ट्रेन ब्लास्टमधील साकीब नाचन आणि त्याचा मुलगा शामिन नाचन या दोघांना ताब्यत घेण्यात आलं आहे. तसेच अटकेतील इतर संशयितांकडून बॉम्ब बनवण्याचं साहित्यही जप्त करण्यात आलं आहे. यामुळं मोठा कट उधळण्यात आला आहे.

ISIS या दहशतवादी संघटनेतर्फे आखण्यात येत असलेला कट आणि कारवायांविरोधात NIA ने देशभरातील 41 जागांवर एकाचवेळी छापेमारी अनेकांना अटक करण्यात आली आहे. आत्तापर्यंत तब्बल 15 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक ठिकाणी एनआयएने छापे मारले आहे, ज्यामध्ये ठाणे ग्रामीण, ठाणे शहर, पुणे, मीरा-भाईंदर या भागांचा समावेश आहे. त्याशिवाय कर्नाटक राज्यातील एका जागीही छापा मारण्यात आला.

ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे –

साकिब नाचन, हासिब मुल्ला, मुसाब मुल्ला, रेहान सुसे, फरहान सूसे, फिरोझ कुवार, आदिल खोत, मुखलिस नाचन, सैफ आतिक नाचन, याह्या खोत, राफिल नाचन, राझील नाचन, शकूब दिवकर, कासीफ बेलारे, मुंझिर केपि

एनआयएच्या छामपेमारीदरम्यान दहशतवाद्यांचं आंतरराष्ट्रीय कनेक्शन आणि ISIS हँडलर्स च्या भागीदारीसह एका मोठ्या कटाचाही पर्दाफाश करण्यात आला आहे. देशात इसिसची विचारधारा रुजवण्याचा डाव या अतिरेक्यांनी आखल्याचे एनआयएच्या तपासात उघड झाले. पुणे शहरातून हे नेटवर्क चालत होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com