Gautam Adani : गौतम अदानींनी विकत घेतली सिमेंट क्षेत्रातील 'ही' मोठी कंपनी
गौतम अदानी यांची मालकी असलेल्या अंबुजा सिमेंट कंपनीच्या वतीनं संघी सिमेंटचं अधिग्रहण केल्याचं जाहीर केलं आहे. कंपनीनं सांघी इंडस्ट्रीजचं अधिग्रहण केल्याचं सांगितलं. अंबुजा सिमेंट सध्याच्या प्रमोटर समूह रवी सांघी अँड फॅमिलीकडून संघी इंडस्ट्रीजमधील बहुसंख्य स्टेक घेणार आहे.
अंबुजा सिमेंटनं केलेला हा सौदा 5000 कोटी रुपयांच्या एंटरप्राइझ व्हॅल्यूमध्ये झाला असल्याची माहिती मिळत आहे. या करारांतर्गत अंबुजा सिमेंट संघी इंडस्ट्रीजच्या प्रोमोटर्सकडून 56.74 टक्के स्टेक घेणार आहे.अदानी समूहाच्या सिमेंट क्षेत्रातील प्रमुख कंपनी अंबुजा सिमेंटच्या या व्यवहाराचा परिणाम कंपनीच्या शेअरवरही दिसून येत आहे.
याच पार्श्वभूमीवर गौतम अदानी म्हणाले की, आम्ही 2028 पर्यंत आमची सिमेंट क्षमता दुप्पट करू. या करारामुळे अंबुजा सिमेंटची प्रतिमा बाजारपेठेत उंचावणार आहे.संघी इंडस्ट्रीजकडे अब्जावधी टन चुनखडीचा साठा आहे आणि अंबुजा सिमेंट संघीपुरम येथील सिमेंट क्षमता पुढील 2 वर्षांत 15 एमटीपीएपर्यंत वाढवेल.कंपनी सिमेंट उत्पादनात 140 एमटीपीए लक्ष्य गाठण्याच्या दिशेनं वाटचाल करत आहे. असे ते म्हणाले.