गौतम अदानी ठरले जगातले तिसऱ्या क्रमांकाचे अतिश्रीमंत

गौतम अदानी ठरले जगातले तिसऱ्या क्रमांकाचे अतिश्रीमंत

गौतम अदानी जगातील तिसरे श्रीमंत व्यक्ती बनणारे पहिले आशियाई बनले आहेत. लुई व्हिटॉनचे अध्यक्ष आणि सीईओ बर्नार्ड अर्नॉल्ट यांना मागे टाकून ब्लूमबर्ग अब्जाधीशांच्या यादीत टॉप ३ मध्ये आपले स्थान निश्चित केले आहे.
Published on

गौतम अदानी जगातील तिसरे श्रीमंत व्यक्ती बनणारे पहिले आशियाई बनले आहेत. लुई व्हिटॉनचे अध्यक्ष आणि सीईओ बर्नार्ड अर्नॉल्ट यांना मागे टाकून ब्लूमबर्ग अब्जाधीशांच्या यादीत टॉप ३ मध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. 137.4 अब्ज डॉलर संपत्तीसह, गौतम अदानी यांनी फ्रान्सच्या बर्नार्ड अर्नॉल्टला मागे टाकले आहे आणि आता ते केवळ एलन मस्क आणि अमेरिकेच्या जेफ बेझोस यांच्या क्रमवारीत मागे आहेत.विशेष म्हणजे चीनचे जॅक मा आणि भारताचे दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांना सुद्धा आजवर हे करणे शक्य झालेले नाही.

ब्लूमबर्ग अब्जाधीश इंडेक्सनुसार गेल्या महिन्यात भारतीय अब्जाधीश गौतम अदानी यांनी बिल गेट्स यांना मागे टाकून जगातील चौथे अब्जाधीश बनले आहेत. 2022 मध्ये अदानी यांनी त्यांच्या संपत्तीमध्ये 60.9 अब्ज डॉलरची भर पडली आहे, जी इतर कोणाहीपेक्षा पाचपट अधिक आहे. त्यांनी फेब्रुवारीमध्ये सर्वात श्रीमंत आशियाई म्हणून मुकेश अंबानींना मागे टाकले, एप्रिलमध्ये अब्जाधीश झाले आणि गेल्या महिन्यात मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनच्या बिल गेट्स यांना मागे टाकून जगातील चौथ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती बनले.

प्रतिष्ठित श्रीमंतांच्या यादीत टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलोन मस्क (२५१ अब्ज डॉलर्स) आणि अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस (१५३ अब्ज डॉलर्स) यांच्यापाठोपाठ १३७.४ अब्ज डॉलर्ससह अदानी यांनी तिसरे स्थान पटकावले आहे. अदानी यांच्या संपत्तीत +१. १२ अब्ज डॉलरची शेवटची वाढ दिसली होती, तर या संपूर्ण वर्षात तब्बल ६०.९ अब्ज डॉलरचा व्यवहार झाला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com