Gautam Adani : गौतम अदानींविरोधात अटक वॉरंट जारी
थोडक्यात
अमेरिकेच्या न्यूयॉर्कमध्ये अदानींवर फसवणुकीचा आरोप
'सौरऊर्जेचं कंत्राटासाठी 250 दशलक्ष डॉलर्सची लाच देण्याचा आरोप
न्यूयॉर्कंच्या फेडरल कोर्टाच्या सुनावणीत अदानींवर आरोप
अमेरिकेच्या न्यूयॉर्कमध्ये अदानींवर फसवणुकीचा आरोप करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. सौरऊर्जेचे कंत्राट मिळवण्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांना 250 दशलक्ष डॉलर्सची लाच देण्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.
गौतम अदानीसह 8 जणांवर अब्जावधी डॉलर्सची फसवणूक आणि लाच घेतल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. न्यूयॉर्कंच्या फेडरल कोर्टाच्या सुनावणीत अदानींवर हा आरोप करण्यात आला आहे.
गौतम अदानी, सागर अदानींविरोध अमेरिकेत अटक वॉरंट जारी करण्यात आला असून यामध्ये अदानी यांच्यासोबत रणजित गुप्ता, सिरिल कॅबेनिस, रूपेश अग्रवाल, सागर अदानी, विनीत एस जैन, सौरभ अग्रवाल, दीपक मल्होत्रा यांचा समावेश आहे.