Ganpati Visarjan 2023 : पुढच्या वर्षी लवकर या...; लाडके बाप्पा निघाले गावाला
10 दिवसांच्या पाहुणचारानंतर लाडका बाप्पा आज निरोप घेणार आहे. दहा दिवसाचा उत्साहात गणेशोत्सव साजरा केल्यानंतर भाविक आज लाडक्या गणरायाला जड अंतकरणाने निरोप देणार आहेत अनंत चतुर्दशी निमित्त ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत विसर्जन करण्यात येणार आहे.
मुंबईच्या राजाच्या अर्थात गणेश गल्लीच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. राजावर ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात येत आहे. तर सांगलीमध्ये अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने मिरजमध्ये सकाळपासून विसर्जन मिरवणुकांना सुरुवात होणार आहे.
कोल्हापूरात देखिल लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी सर्वजण सज्ज झाले आहेत. मानाच्या गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक सुरु झाल्यानंतर शहरातील विसर्जन मिरवणूक सुरु होते. तसेच पुण्यात देखिल गणपती विसर्जनाचा उत्साह पाहायला मिळतोय. पहिले पाच मानाचे गणपती बेलबाग चौकात येऊन लक्ष्मी रस्त्याने मार्गस्थ होतील. तर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती यंदा साडेचार वाजता मिरवणुकीत सहभागी होणार आहे.
गणपती विसर्जनानिमित्त ठाण्यात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच वाहतूक विभागाकडून वाहतुकीत बदल करण्यात आलेला आहे. ड्रोन कॅमेऱ्याने देखिल नजर ठेवण्यात येणार आहे.