केज पोलिसांकडून 56 लाखांचा गांजा जप्त

केज पोलिसांकडून 56 लाखांचा गांजा जप्त

बीडच्या केज तालुक्यातील बनसारोळा येथे तब्बल 56 लाख रुपयांचा गांजा जप्त
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

विकास माने, बीड

बीडच्या केज तालुक्यातील बनसारोळा येथे पोलिसांनी तब्बल 56 लाख रुपयांचा गांजा जप्त केला आहे. एका सरकारी गायरान जमिनीवर अज्ञात इसमाने गांजाची लागवड केली होती. याची माहिती पोलिसांना मिळताच या ठिकाणी छापा टाकून 550 किलो गांजा जप्त करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

तुरीच्या पिकात त्या अज्ञात व्यक्तीने गांजाची लागवड केली होती. या गांजाची नेमकी लागवड कोणी केली? याचा तपास पोलीस घेत आहेत. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच माहिती गांजाची सर्व झाडे त्यांनी ताब्यात घेतली आहे.

गांजाचे वजन 550 किलो असून त्याची किंमत 56 लाख रुपये असल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणात पोलीस अधिक तपास करत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com