Kalyan
Kalyan Team Lokshahi

पुजाऱ्याच्या घरी सशस्त्र दरोडा टाकणारी टोळी गजाआड

दरोड्यानंतर पळण्यासाठी वापरलेल्या गाडीमुळे पकडले गेले दरोडेखोर
Published by :
Sagar Pradhan
Published on

अमजद खान|कल्याण: उल्हासनगरातील पुजा:याच्या घरी दरोडा टाकून लाखो रुपयांचा ऐवज लूटणा:या दरोडेखोरांना कल्याण क्राईम ब्रांच पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या आहेत. या दरोडेखोर टोळीचा म्होरक्या मुंब्रा येथे व्याजाचा धंदा करतो. व्याजावर धंदा करण्यासाठी त्याने ही लूट केल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणी चार जणांना अटक केली आहे. या गुन्ह्यात वापरलेल्या गाडीमुळे हे आरोपी पोलिसांच्या जाळयात सापडले आहेत.

Kalyan
'दम मारो दम' बिडी,सिगारेटसाठी कैद्यांचा थेट उपोषणाचा इशारा; अखेर मागणी मान्य

तीन ऑगस्ट रोजीच्या पहाटे पाच वाजताच्या सुमारास उल्हासनगरातील पुजारी जाॅकी जग्यासी यांच्या घरी दरोडा टाकण्यात आला. दराडेखोरांनी पुजाऱ्याचा मुलीच्या गळ्यावर शस्त्रचा धाक दाखवून घरातील लाखो रुपयांचा ऐवज लूटला. पोलिस दफ्तरी दहा लाख 4क् हजार रुपये लुटल्याचे दाखविण्यात आले होते. मात्र घरातील पाच लाखाचा ऐवज दरोडेखोरांनी लूटल्याचे बोलले जात होते.

या दरोडेखोरांच्या शोधासाठी आठ तपास पथके नेमण्यात आली. अखेर या दरोडेखोरांना पकडण्यात कल्याण क्राईम ब्रांचला यश आले आहे. या दरोडय़ात आरोपींनी जी गाडी वापरली होती. ती गाडी कळंबोळी येथून चोरी करण्यात आली होती. पोलिसांनी सीसीटीव्हीमध्ये या गाडीची माहिती काढली. तेव्हा माहिती समोर आली की, ही गाडी अंबरनाथच्या पालेगावात ठेवण्यात आली. दरोडेखोरांनी पाले गावातून दुस:या गाडीने पसार झाले. गुन्ह्याच्या नंतर एक गाडी सीसीटीव्हीत आढळून आली होती.

Kalyan
खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभेत भाजपचे 'मिशन 2024'

या गाडीच्या सहाय्याने क्राईम ब्रांचची टीम आरोपी पोहचली. या प्रकरणातील चौघे दरोडेखोर जेरबंद करण्यात आले आहेत. यातील मुंब्रा येथे राहणारा अकबर खान हा व्याजावर पैसे देण्याचा धंदा करतो. या धंद्यासाठी त्याने हा दरोडा टाकल्याचे समोर आाले आहे. यातील अन्य आरोपींची नावे आसीफ शेख, शिवलिंग शिकलकर, राहूल सिंग जुनी अशी आहेत. आसीफ हा मुंब्रा येथे राहणारा आहे. अन्य दोन जण हे कल्याण डोंबिवलीत राहत होते. या आरोपींना विठ्ठलवाडी पोलिस ठाण्याच्या हवाली सूपूर्द करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com