Wardha: वर्ध्याच्या गिरड हद्दीत जुगार अड्ड्यावर धाड, अर्ध्या कोटींचा मुद्देमाल जप्त
भूपेश बारंगे | वर्धा: वर्ध्याच्या गिरड हद्दीतील फरीदपूर येथील शेतातील गोठ्यात हारजीतीचा जुगार खेळ सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला माहिती मिळताच रात्रभर पाळत ठेवून पहाटेच्या सुमारास धाड टाकले, स्थानिक गुन्हे शाखेचे दबंग पोलीस निरीक्षक विनोद चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली धडाकेबाज कारवाई करण्यात आली.
या कारवाईमध्ये 28 जुगारावर गिरड पोलिसांत गुन्हा दाखल केला असून 23 जणांना ताब्यात घेतले तर पाच आरोपी पसार झाले आहे. अशोक गड्डमवार त्याचे साथीदारसह गिरड क्षेत्रात मोठ्या प्रमाणात जुगार भरवीत होता. याची कुणकुण स्थानिक गुन्हेला खात्रीशी माहिती मिळताच मिळताच (ता. 23 व 24) चे रात्र दरम्यान रात्रभर पाळत ठेवून हालचालीवर लक्ष ठेवुन वेगवेगळी पथक तयार करुन सापळा रचला. फरीदपूर येथील शेतातील गोठ्यात सुरु असलेल्या जुगार अड्डयावर चारही बाजुने घेराव करुन छापा घातला असता रंगेहाथ जुगार खेळताना मिळून आले. आरोपी सलिम शेख गफ्फार शेख वय 29 वर्षे रा पुलफैल वर्धा, राजु नथ्थुजी नौकरकर वय 52 वर्ष रा. गिरड, पांडुरंग रामाजी फलके वय 42 वर्ष रा. धगडबन, रामलाल भगवानजी गंडे वय 40 वर्ष रा. गिरड, आतिश विक्रम रामटेके वय 38 वर्ष रा. नंदोरी, विशाल अशोक रोहणकर वय 27 वर्ष रा. वार्ड नं. 3 गिरड, सचिन आनंदराव धारणे वय 25 वर्ष रा. कोरा, अंकित चंद्रशेखर ढोक वय 23 वर्ष रा. कोरा, अरुन विठ्ठल सावरकर वय 50 वर्ष रा. नंदोरी, प्रकाश बापुरावजी लोहट वय 45 वर्ष रा. गिरड,कवड्डु नारायन नंन्नवरे वय 30 वर्ष रा. फरिदपुर,योगेश महादेव महाकाळकर वय 56 वर्ष रा. हिंगणघाट , रोषन राजु नारनवरे वय 20 वर्ष रा. कोरा, प्रेमदास लहुजी चांग वय 27 वर्ष रा. गिरड, राजु उर्फ राजेश हरिभाऊ तिमांडे वय 44 वर्ष रा. तरोडा, महेंद्र किसनजी झाडे वय 38 वर्ष रा. समुद्रपुर, वैभव रमेशराव मेहता वय 35 वर्ष रा. सुरगांव (रहकी) , जगदिश मुधुकर रोकडे वय 34 वर्ष रा. सेलु , रुपेश अरुण घोडे वय 32 वर्ष रा. बरबडी, प्रफुल देवरावजी बोरीकर वय 40 वर्ष रा. गिरड, जितेंद्र उर्फ जितु गधुकर झाडे वय 35 वर्ष रा. नंदोरी, मंगेश कुंडलिक खाटीक वय 43 वर्ष रा. गिरड, सचिन ब्रम्हानंद लोखंडे वय 31 वर्ष रा. कोरा, डिस्कव्हर गाडी क्र एमएच 32 यु 4001 चा चालक (पसार) हे 52 तास पत्यावर पैशे लावून हारजीतचा खेळ खेळतांना रंगेहाथ मिळून आले.
आरोपीचे ताब्यातुन जुगाराचे नगदी 2,16,860, तर 22 मोबाईल संच किंमत. 3,04,000, 6 चारचाकी वाहन व 6 दुचाकी वाहने किंमत 44,95,000/-रु. असा एकुण 50,15,860/-रु. चा मुद्येमाल जप्त केला. आरोपींना सदर जुगार अड्ड्याबाबत सखोल विचारपूस केली असता सदर जुगार अड्डा हा गिरड येथे राहणारा अशोक गड्डमवार, हा त्याचे साथीदार विशाल बहादूरें रा. धोंडगाव, विलास लभाने रा. गिरड तसेच शेत मालक सुधिर धानोरे रा. फरिदपुर यांनी संगनमताने 52 तास पत्त्यावर मांग पत्याच्या जुगारावर पैश्याची बाजी लावुन स्वताचे आर्थिक फायद्याकरीता जुगार भरविलेला आहे. असे एकुण 28 आरोपी विरुध्द जुगार कायद्यान्वये पोलीस स्टेशन गिरड येथे गुन्हा नोंद करण्यात आला. सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक अनुराग जैन, अपर पोलीस अधीक्षक डॉ. सागर कवडे, यांचे निर्देशाप्रमाणे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, पोलीस उपनिरीक्षक उमाकांत राठोड, अमोल लगड, पोलीस अंमलदार मनोज धात्रक, अरविंद येणुरकर, गजानन लागसे, सचिन इंगोले, भुषण निघोट, प्रमोद पिसे, महादेव सानप, पवन पन्नासे, रितेश शर्मा, रामकिसन ईप्पर, मनिष कांबळे, विकास मुंडे, गोपाल बावनकर, अमोल नगराळे, अभिषेक नाईक, मुकेश ढोके, दिपक साठ, अरविंद इंगोले, हर्षल सोनटक्के, मंगेश आदे, शुभम राऊत, राहुल अधवाल यांनी केली असुन तपास सुरू आहे.
फरीदपूर येथील शेतातील गोठ्यात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने पथक नेमून रात्रभर पाळत ठेवली.जुगार अड्ड्यावर धाड टाकण्यासाठी चारही बाजूने पोलिसांचा सापळा रचून जुगाराना पकडण्यात यश आले.अर्ध्या कोटीच्या मुद्देमाल जप्त केला असून जिल्ह्यात धडाकेबाज कारवाई केल्याची सर्वत्र चर्चा आहे.