छत्तीसगड सीमेवरच्या जंगलात चकमक; गडचिरोली पोलिसांनी १२ नक्षलवाद्यांच्या केला खात्मा, फडणवीस म्हणाले...
Gadchiroli Naxal Attack : गडचिरोलीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. गडचिरोली पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये छत्तीसगडच्या सीमेवर चकमक झाली. या चकमकीत पोलिसांनी १२ नक्षलवाद्यांचा कंठस्नान दिलं असून त्यांचे मृतदेहही सापडले आहेत. नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात पोलीस उप निरीक्षक (पीएसआय) आणि जवान जखमी झाला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पोलिसांना ५१ लाखांचं बक्षिस जाहीर केलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गडचिरोली पोलीस आणि नक्षलवादी यांच्यामध्ये छत्तीसगढच्या सीमेवरील जंगलात मोठी चकमक झाली. दोन्ही बाजूंनी चकमक सुरु असताना पोलिसांनी १२ नक्षलावाद्यांचा खात्मा केला. परंतु, या चकमकीत एक पोलीस उप निरीक्षक आणि एक जवान जखमी झाला आहे. दरम्यान, ज्या १२ माओवाद्यांना पोलिसांनी ठार केलं, त्यांचा मृतदेह सापडल्याची माहिती फडणवीसांनी माध्यमांशी बोलताना दिली.
गडचिरोलीत झालेल्या नक्षलवादी हल्ल्याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. फडणवीस म्हणाले, गडचिरोली-छत्तीसगढ सीमेवर काकेर जवळ गडचिरोली पोलिसांनी एक मोठं ऑपरेशन केलं. या ऑपरेशनमध्ये १२ माओवाद्यांचा थात्मा करण्याचं काम पोलिसांनी केलं आहे. दुपारपासून एन्काऊंटर सुरु आहे. १२ माओवादी मारले गेले असून त्यांचे मृतदेह मिळाले आहेत.