गडचिरोली :- आरमोरी तालुक्यात बोरी चक या गावातील जंगलात जाणाऱ्या एका शेतकऱ्यावर, वाघाने हल्ला केल्याची घटना २९ जून रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. यात शेतऱ्याचा मृत्यू (Death) झाला आहे. वाघाने ठार केलेल्या व्यक्तीचे नाव सागर आबाजी वागरे वय 46 रा. बोरीचक असून हा व्यक्ती शेतीच्या कामासाठी काड्या आणायला जंगलात गेला होता. वन विभागाच्या वतीने वारंवार केलेल्या आवाहनाला प्रतिसाद न देता जंगल परिसरात जाणे या व्यक्तीला आज महागात पडले. आणि विदारक वास्तव चित्र आपल्याला पाहायला मिळाले आहे. (Gadchiroli farmer killed in tiger attack)
घटनेची माहिती मिळताच पोलिस यंत्रणा आणि वन विभागाची यंत्रणा घटनास्थळी पोहचली. घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. वन विभागाच्या वतीने वारंवार केलेल्या आवाहनाला झुगारून जंगलात जाणाऱ्या लोकांना आता कसे सांगायचे असा प्रश्न वन विभागाच्या प्रशासनाला पडला आहे. व्यक्तीच्या कुटुंबाला 30 हजारांची आर्थिक मदत देण्यात येणार असल्याची माहिती आहे.
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने एक नव्हे, दोन नव्हे, तब्बल दोनशे वाहनांची बोगस नोंदणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे. हा कारनामा करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याचे समजते. या प्रकाराने आरटीओ कार्यालयात खळबळ उडाली आहे. यामुळे अधिकाऱ्यांची धावपळ सुरू आहे.
आरटीओ विभाग म्हटला म्हणजे सोन्याची अंडी देणारी कोंबडीच. त्यामुळे आरटीओ कार्यालय असो किंवा तपासणी नाका असो ते नेहमीच चर्चेत आणि वादग्रस्त राहिले आहेत. आता नंदुरबार येथील उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या कार्यालयात मोठा गडबड घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. या कार्यालयाने दोनच महिन्यात सुमारे दोनशे वाहनांची बोगस नोंदणी केल्याचे प्राथमिक दृष्ट्या उघड झाले आहे. त्यामुळे उपप्रादेशिक परिवहन विभागात खळबळ उडाली आहे.
नंदुरबार उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकाऱ्यांची यूजर आयडी हॅक करून विविध मॉडेलचे 83 वाहने नोंदणी केल्याचे दाखवत कागदपत्रांमध्ये खाडाखोड करून व्हीआयपी नंबर वापरून आरटीओची 66 लाख 59 हजार 900 रुपयांची फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी 83 वाहन चालकांसह दोन एजंटांवर पोलीसात ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकार्यांनी फिर्याद दिली आहे. औरंगाबाद येथील वाहन एजंट सलीम खान, इमरान सैय्यद तळोदा नंदुरबार यांच्यासह 83 वाहन धारकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.