उसाला एक रकमी एफआरपी अधिक २०० रुपये द्या नाही तर... : राजू शेट्टी

उसाला एक रकमी एफआरपी अधिक २०० रुपये द्या नाही तर... : राजू शेट्टी

साखरेला बाजारात चांगला भाव आहे. तरीही कारखानदारांनी गत हंगामातील एफआरपीची रक्कम दिलेली नाही . कारखानदारांनी एफआरपी अधिक २०० रुपये द्यावे,  अन्यथा कारखान्याचे धुराडे पेटू देणार नाही , असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला . येणाऱ्या हंगामात एकरकमी एफआरपीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

संजय देसाई, सांगली

साखरेला बाजारात चांगला भाव आहे. तरीही कारखानदारांनी गत हंगामातील एफआरपीची रक्कम दिलेली नाही . कारखानदारांनी एफआरपी अधिक २०० रुपये द्यावे,  अन्यथा कारखान्याचे धुराडे पेटू देणार नाही , असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला. येणाऱ्या हंगामात एकरकमी एफआरपीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यातील कारखान्यांनी एफआरपीचे तुकडे केले आहेत. अजूनही एफआरपीची रक्कम शिल्लक आहे. कारखानदारांनी एफआरपी अधिक २०० रुपये द्यावेत . थकीत बिलावर १५ टक्के व्याज द्यावे. बाजारात साखरेला ३२०० ते ३३०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. शेट्टी म्हणाले, कारखान्यांचे काटामारीचे प्रमाण तोंडात बोट घालायला लावणारे आहे . खेपेमागे अडीच ते तीन टनांचा काटा मारला जात आहे .

राज्यात १३ कोटी २० लाख टन उसाचे गाळप केले जाते. त्यामध्ये १ कोटी ३२ लाख टन उसाची काटामारी केली जाते. त्या उसाच्या केंद्र शासनाने इथेनॉलचे भाव बांधून दिलेले आहेत . यातून ७०० ते ९ ०० रुपयांचे जादा उत्पन्न कारखान्यांना मिळत आहे . त्यामुळे कारखान्यांनी गत हंगामातील उसाला एफआरपी अधिक २०० रुपये शिजन सुरू होण्यापूर्वी द्यावेत अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे .

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com