Zombie Virus
Zombie VirusTeam Lokshahi

फ्रेंच शास्त्रज्ञांनी 48,500 वर्ष जुना झोम्बी व्हायरस केला पुनरुज्जीवित

रशियामध्ये गोठलेल्या तलावाखालील झोम्बी विषाणूचे फ्रेंच शास्त्रज्ञांनी पुनरुज्जीवन केले
Published on

नवी दिल्ली : प्रदूषणामुळे हवामान बदलाचे वाईट परिणाम होतील, असे शास्त्रज्ञ नेहमीच सांगत आले आहेत. वाढत्या तापमानामुळे केवळ हिमनद्याच वितळत नाहीत, तर बर्फाखाली गोठलेले अनेक दशके जुने विषाणूही समोर येत आहेत. झोम्बी व्हायरस त्यापैकीच एक आहे.

Zombie Virus
...नाहीतर मानेवर वसुलीची ‘सुरी’ फिरवू; शिवसेनेचा शिंदे सरकारवर टीकास्त्र

युरोपियन संशोधकांनी रशियाच्या सायबेरिया प्रदेशात पर्माफ्रॉस्ट म्हणजेच गोठलेल्या जमिनीखाली गोळा केलेल्या नमुन्यांची तपासणी केली आहे. या दरम्यान 13 नवीन विषाणू आढळले आहेत. ज्याला झोम्बी व्हायरस असे नाव देण्यात आले आहे आणि असेही आढळून आले आहे की हजारो वर्षे गोठलेल्या जमिनीत राहूनही हे विषाणू संसर्गजन्य आहेत. माहितीनुसार, हे विषाणू 48,500 वर्षांपूर्वी एका तलावाखाली सापडले आहेत.

ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, शास्त्रज्ञ आणि संशोधक बऱ्याच काळापासून इशारा देत आहेत की ग्लोबल वॉर्मिंगमुळे तापमान वाढत आहे. त्यामुळे कायमस्वरूपी गोठलेल्या बर्फाच्या वितळण्याने आधीच अडकलेले मिथेनसारखे हरितगृह वायू बाहेर पडू लागले आणि हवामान बदलही होतील. तथापि, निष्क्रिय व्हायरसवर त्याचा प्रभाव कमी समजला जातो.

Zombie Virus
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर तीन ट्रकचा अपघात

रशिया, जर्मनी आणि फ्रान्सच्या संशोधकांच्या टीमने सांगितले की, त्यांच्या संशोधनात विषाणूच्या पुनरुत्थानाचा जैविक धोका पूर्णपणे नगण्य असल्याचे दिसून आले आहे. प्राणी किंवा मानवांना संक्रमित करू शकणार्‍या विषाणूचे संभाव्य पुनरुज्जीवन ही एक मोठी समस्या आहे. ही कधीही मोठी समस्या बनू शकते. यामुळे कोरोनानंतर जगावर आता नव्या साथीच्या रोगाची भीती निर्माण झाली आहे.

Zombie Virus
तुकाराम मुंढेंची शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com