Free Booster Dose
Free Booster DoseTeam Lokshahi

Free Corona Booster Dose : 75 दिवस मोफत बूस्टर डोस; कधी, कुठे, कसा मिळणार?

भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सव आणि केंद्र सरकारच्या निर्देशानुसार देशात 75 दिवसांसाठी 'कोविड लस अमृत महोत्सव' राबविण्यात येणार आहे. मुंबई महानगरात देखील आजपासून हा महोत्सव सर्व शासकीय आणि महानगरपालिका लसीकरण केंद्रांवर (Covid Booster Dose) बुस्टर डोस देण्यात येणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सव आणि केंद्र सरकारच्या निर्देशानुसार देशात 75 दिवसांसाठी 'कोविड लस अमृत महोत्सव' राबविण्यात येणार आहे. मुंबई महानगरात देखील आजपासून हा महोत्सव सर्व शासकीय आणि महानगरपालिका लसीकरण केंद्रांवर (Covid Booster Dose) बुस्टर डोस देण्यात येणार आहे.

10 जानेवारी 2022 पासून देशात बूस्टर डोस (Covid Booster Dose) सुरू करण्यात आला. फ्रंटलाइन कोरोना योद्धा आणि ६० वर्षांवरील वृद्धांना बूस्टर डोस मोफत मिळत आहे, तर 18 ते 59 वयोगटातील लोकांना एका डोससाठी ३७५ रुपये लागत आहे (रु. 225 लस + रु 150 सेवा शुल्क). कदाचित त्यामुळेच भारतात बूस्टर डोस घेण्याची गती मंद आहे. आतापर्यंत, केवळ 3.7 % लोकसंख्येला बूस्टर डोस मिळाला, तर 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या 25.84% लोकांना तो मिळाला आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, स्वातंत्र्याच्या अमृतकाळानिमित्त मोफत बूस्टर डोसचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारने बुधवारी निर्णय घेतला की 18 वर्षांवरील सर्व लोकांना 15 जुलैपासून कोरोना लसीचा बूस्टर डोस(Covid Booster Dose) (प्रिकॉशन) मोफत मिळू शकेल. ही सुविधा फक्त 75 दिवसांसाठी (27 सप्टेंबर) सरकारी केंद्रांवर उपलब्ध असेल. त्यानंतर बूस्टर डोसचा खर्च पूर्वीप्रमाणेच स्वतःला करावा लागणार आहे.

18 वरील पात्र लाभार्थ्यांना कोविड-19 लसीचा दुसरा डोस घेतल्‍यानंतर 6 महिने अथवा 26 आठवडे पूर्ण झालेले आहेत, अशा लाभार्थ्यांना प्रतिबंधात्मक मात्रा (Booster Dose) विनामूल्य दिली जाणार आहे.

केंद्र सरकारने देशाच्‍या स्‍वातंत्र्यास 75 वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून, 15 जुलै ते 30 सप्‍टेंबर 2022 या कालावधीपर्यंत ‘कोविड लस अमृत महोत्‍सव’ उपक्रमाचे आयोजन केले आहे. या ७५ दिवसांच्या कालावधीत वय वर्षे १८ वरील सर्व पात्र लाभार्थ्‍यांना कोविड लसीचा बूस्टर डोस मुंबईतील सर्व शासकीय व महानगरपालिका लसीकरण केंद्रांवर विनामूल्य देण्‍यात येणार आहे.

बुस्टर डोस (Covid Booster Dose) घेण्यासाठी मुंबईत महानगरपालिका व शासकीय रुग्णालयात 104 तर खासगी रुग्णालयात 125 अशी एकूण 229 कोविड-19 लसीकरण केंद्रं सध्या कार्यान्वित आहेत.

Free Booster Dose
Mumbai High Tide : आज दुपारी 1.22 वाजता यंदाच्या मोसमातील सर्वात उंच भरती येणार
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com