ताज्या बातम्या
Free Booster Dose : 18 वर्षांवरील सर्वांना मोफत 'बुस्टर'; सरकारची विशेष मोहिम
18-59 वयोगटातील 77 कोटी लोकसंख्येच्या 1 टक्क्यांहून कमी लोकांना खबरदारीचा डोस देण्यात आला आहे.
नवी दिल्ली : देशातील सर्व प्रौढ नागरिकांन शुक्रवारपासून मोफत बस्टर डोस मिळणार आहे. पुढील 75 दिवसांत विशेष मोहिमेअंतर्गत सरकारी केंद्रांवर मोफत कोरोनालसीचे बूस्टर डोस मिळणार आहेत. भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त सरकारच्या 'आझादी का अमृत महोत्सव' उत्सवाचा भाग म्हणून ही मोहीम आयोजित केली जाईल. आतापर्यंत, 18-59 वयोगटातील 77 कोटी लोकसंख्येच्या 1 टक्क्यांहून कमी लोकांना खबरदारीचा डोस देण्यात आला आहे. दरम्यान, 60 आणि त्याहून अधिक वयोगटातील अंदाजे 16 कोटी पात्र लोकसंख्येपैकी सुमारे 26 टक्के तसेच आरोग्यसेवा आणि फ्रंटलाइन कामगारांना बूस्टर डोस मिळाला आहे, अशी माहिती पीटीआयने एका दिली आहे.