भूपेश बारंगे | वर्धा: वर्ध्यातील मसाळा येथील चार अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्याने सेलू पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात वर्धा पोलीसाचे वेगवेगळे पथक बनवून रात्रीपासून त्यांचा सर्वत्र शोध घेत असताना आज दुपारी 'त्या' चारही मुले वर्धा रेल्वे स्थानकावर फिरतानाचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला असून पोलिसांनी सुटकेचा श्वास घेतला आहे.
मसाळा येथील अल्पवयीन चार मुले वर्धा रेल्वे स्थानकावर जवळपास एक तास फिरत राहिले.आणि त्यानंतर गांधीधाम गुजरात ते पुरी ओडिशा रेल्वेत बसून निघून गेल्याचे सांगण्यात येत आहे. रेल्वे स्थानकावर फिरत असताना त्यांच्या आजूबाजूने कोणीही दिसून येत नसल्याने स्वतःच्या मनमर्जीने ते मुले निघून गेल्याचे दिसून येत आहे.
अफवेवर विश्वास ठेवू नका पोलिसांचे आवाहन:
चार मुले बेपत्ता झाल्याने अफवेल पेव फुटला होता.अनेक तर्कवितर्क केले जात होते मात्र ते चारही अल्पवयीन मुले हे स्वतः रेल्वे स्थानकावर गेले असल्याने ते तेथून निघून गेले असल्याने जिल्ह्यात अनेक अफवा पसरली होती यांना कोणत्यातरी टोळीने पळवून नेले असावे आव नागरिकांत चर्चा होती मात्र ही सर्व मुले रेल्वेने बाहेर निघून गेल्याचे दिसून आल्याने अश्या अफवेवर विश्वास ठेवू नका असे आवाहन पोलीस करीत आहे.