Jammu Kashmir Encounter | Terrorist
Jammu Kashmir Encounter | Terrorist team lokshahi

Jammu Kashmir : काश्मीरमध्ये 4 दहशतवाद्यांचा खात्मा, कुपवाडा आणि कुलगाममध्ये चकमक

काश्मीरमध्ये 4 दहशतवादी ठार
Published by :
Shubham Tate
Published on

Jammu Kashmir Encounter : जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथील डी.एच. पोरा भागात दहशतवाद्यांसोबत सुरक्षा दलांची चकमक सुरू आहे. जम्मू-काश्मीर (Jammu Kashmir) पोलिसांनी सांगितले की, पोलीस आणि लष्कर संयुक्तपणे कारवाईत करत आहेत. कुलगाममध्ये आतापर्यंत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. तत्पूर्वी, कुपवाडा पोलिसांनी लोलाब परिसरात लष्करासोबत (Army) संयुक्त दहशतवादविरोधी अभियान सुरू केले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या दहशतवादी (terrorist) शौकत अहमद शेखकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सुरक्षा दलांनी कुपवाडा येथील लोलाब भागात ऑपरेशन सुरू केले, त्यानंतर चकमक झाली. (four let terrorist killed in encounter in kupwara jammu kashmir)

काश्मीर पोलिसांनी ट्विट केले की, विविध ठिकाणी शोध घेत असताना तेथे लपलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा जवानांवर गोळीबार केला, ज्याला सुरक्षा दलांनी प्रत्युत्तर दिले आणि या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. अटक करण्यात आलेला दहशतवादीही जाळ्यात सापडल्याचे पोलिसांनी सांगितले. या भागात अजूनही चकमक सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Jammu Kashmir Encounter | Terrorist
'अग्निपथ' योजना मागे घेणार नाही, आंदोलकांना सैन्यात प्रवेश नाही; लष्कराचे स्पष्टीकरण

दहशतवाद्याची ओळख पाकिस्तानी नागरिक अशी झाली आहे

पोलीस महानिरीक्षक (काश्मीर) विजय कुमार यांच्या म्हणण्यानुसार, मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांपैकी एकाची ओळख पाकिस्तानी नागरिक अशी झाली आहे, जो प्रतिबंधित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाशी संबंधित होता. अटक केलेल्या दहशतवाद्यासोबत आणखी दोन-तीन दहशतवादी या सुरू असलेल्या चकमकीत अडकले आहेत.

खोऱ्यात सतत चकमकी

तीन दिवसांपूर्वी सुरक्षा दलांनी दोन वेगवेगळ्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. अनंतनाग जिल्ह्यातील हंगलगुंड भागात झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना ठार केले. आयजीपी विजय कुमार यांनी सांगितले की, ठार झालेल्या दहशतवाद्यांची ओळख हिजबुल मुजाहिद्दीनचा जुनैद आणि बासित भट अशी आहे. गेल्या वर्षी अनंतनागमध्ये भाजपचे सरपंच रसूल दार, त्यांची पत्नी आणि एका पंचाच्या हत्येत दहशतवादी बासितचा हात होता. याआधी कुलगाममधील मिशीपुरा भागात सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना ठार केले होते. कुलगामच्या मिशीपोरा भागात दहशतवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी मंगळवारी दहशतवादविरोधी अभियान सुरू केले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com